Home /News /sport /

IND vs NZ : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रहाणेच्या फॉर्मवर कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

IND vs NZ : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रहाणेच्या फॉर्मवर कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) फॉर्म सध्या हरपला आहे. या खराब फॉर्ममुळे त्याची टीममधील जागा धोक्यात आली आहे.

    मुंबई, 6 डिसेंबर : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) फॉर्म सध्या हरपला आहे. या खराब फॉर्ममुळे त्याची टीममधील जागा धोक्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमध्ये (India vs New Zealand) कानपूर टेस्टमध्ये रहाणेला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तर मुंबई टेस्ट तो दुखापतीमुळे खेळला नाही. आता भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) रहाणेच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई टेस्ट जिंकल्यानंतर मीडियाशी बोलताना विराट म्हणाला की, 'अजिंक्य रहाणेच्या फॉर्मचं कुणीही मुल्यमापन करू शकत नाही. मी स्वत: (विराट कोहली) देखील ते करत नाही. तो सध्या कोणत्या परिस्थितीमधून जातोय हे फक्त त्यालाच माहिती ईहे. त्यानं यापूर्वी टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे. आता आम्हाला त्याला आधार देण्याची गरज आहे. इथं काय सुरू आहे, असं एक खेळाडू म्हणून त्याला कधीही वाटता कामा नये. आम्ही असं कधीही करत नाही. एक खेळाडू म्हणून आमच्या डोक्यात यावेळी काय सुरू असंत हे मला माहिती आहे. त्याचबरोबर टीममधील वातावरणाची देखील कल्पना आहे. बाहेर खूप काही घडत असतं. त्या घडामोडींचा आमच्या खेळण्याच्या पद्धतीवर फरक पडत नाही. आम्ही टीममध्ये सर्वांनाच पाठिंबा देतो. अजिंक्य असो वा अन्य कुणी बाहेर घडणाऱ्या गोष्टींचा आमच्यावर फरक पडत नाही.' असे विराटने स्पष्ट केले.' रोहित घेणार रहाणेची जागा! भारतीय टीम याच दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. या दौऱ्यासाठी रहाणेची निवड होईल. पण टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन हे पद तो गमावण्याची दाट शक्यता आहे. या पदासाठी टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मा याचं नाव आघाडीवर आहे. निवड समितीाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल.  भारत-न्यूझीलंड सीरिजमध्ये शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या नवोदितांनी चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि हनुमा विहारी हे पर्याय देखील मिडल ऑर्ससाठी टीम मॅनेजमेंटसमोर आहेत. त्यामुळे अजिंक्यची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली तर त्याला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळणे हे अवघड झाले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket news, Virat kohli

    पुढील बातम्या