• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: रोहित आणि विराटपेक्षा जास्त सरासरी असूनही टीम इंडियातील जागा धोक्यात, आता उरल्या 3 संधी

IND vs NZ: रोहित आणि विराटपेक्षा जास्त सरासरी असूनही टीम इंडियातील जागा धोक्यात, आता उरल्या 3 संधी

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूला मोठा स्कोअर करण्यात अपयश आले.

 • Share this:
  कानपूर, 25 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) फक्त 13 रन काढून आऊट झाला.  या सीरिजमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मयांकला प्लेईंग 11 मध्ये संधी  मिळाली. पण, त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी ओपनिंग करेल असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे मयांक अग्रवालची टीममधील जागा धोक्यात आली आहे. त्याला प्लेईंग 11 मधील स्थान कायम ठेवण्यासाठी आता फक्त 3 इनिंग शिल्लक आहेत. होम पिचवर दमदार कामगिरी मयांकची भारतामधील पिचवरील कामगिरी दमदार आहे. त्यानं आजवर 6 टेस्टमधील 7 इनिंगमध्ये 610 रन काढले आहेत. यामध्ये 3 शतकांचाही समावेश आहे. टीम इंडियाीतील दिग्गज खेळाडूंपेक्षा त्याची सरासरी चांगली आहे. रोहित शर्मानं भारतामध्ये 18 टेस्टमधील 27 इनिंगमध्ये 80 च्या सरासरीनं रन काढले आहेत. विराट कोहलीची (Virat Kohli) भारतीय पिचवरील सरासरी 64 असून राहुलची 44 आहे. महेंद्रसिंह धोनीचा मास्टर स्ट्रोक, मुंबई इंडियन्सच्या ट्रम्प कार्डला देणार CSK मध्ये एन्ट्री! मयांकनं त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 14 टेस्ट खेळल्या असून यामध्ये 1052 रन काढले आहेत. यामध्ये 3 शतक आणि 4 अर्धशतकाचा समावेश आहे. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 119 इनिंगमध्ये 60 च्या सरासरीनं 5167 रन काढले आहेत. यामध्ये 11 शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश असून 304 हा त्याचा सर्वोच्च आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्येही त्यानं पंजाब किंग्जकडून (Punjab Kings) दमदार बॅटींग केली होती.
  Published by:News18 Desk
  First published: