• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : टेस्ट सीरिजसाठी द्रविड लागला कामाला, जडेजानं घेतला महत्त्वाचा निर्णय

IND vs NZ : टेस्ट सीरिजसाठी द्रविड लागला कामाला, जडेजानं घेतला महत्त्वाचा निर्णय

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचची टी20 मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून द्रविडची (Rahul Dravid) ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेसाठी द्रविडनं जय्यत तयारी सुरू केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचची टी20 मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. या मालिकेनंतर लगेच 25 नोव्हेंबरपासून 2 टेस्टची मालिका (IND vs NZ Test Series) होणार आहे. टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची (Rahul Dravid) ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेसाठी द्रविडनं जय्यत तयारी सुरू केली आहे.  त्यानुसार टीम इंडियाच्या टेस्ट टीममधील खेळाडूंचा विशेष कॅम्प मुंबईत होणार आहे. या कॅम्पसाठी  (Ishant Sharma), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं 'इनसाईड स्पोर्ट्स' ला दिलेल्या माहितीनुसार या कॅम्पची गरज असल्याचं मत द्रविडनं व्यक्त केली होती. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळली होती. त्यानंतर त्यांनी एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही. त्यामुळे या कॅम्पची या खेळाडूंना मदत होणार आहे. मुंबईतील कॅम्पनंतर हे सर्व खेळाडू कानपूरला रवाना होतील. कानपूरमध्ये 25 नोव्हेंबरपासून पहिली टेस्ट मॅच होणार आहे. द्रविड सध्या टी20 मॅचसाठी जयपूरमध्ये आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' नं दिलेल्या रिपोर्टनुसार हा कॅम्प बंगळुरूमध्ये घेण्याची बीसीसीआय आणि द्रविडची इच्छा होती. कारण तिथं खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (NCA) कोचच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण मिळू शकते. पण या कॅम्पची जागा शेवटच्या क्षणी बदलण्यात आली. 3 डिसेंबरपासून दुसरी टेस्ट मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळे मुंबईतील कॅम्पचा टीम इंडियाला फायदा होणार आहे. रवी शास्त्रींनी सांगितला पुढचा प्लॅन, टीम इंडियानंतर 'या' टीमचा कोच होण्यास तयार जडेजानं घेतला निर्णय टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) प्रमाणे रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) त्याची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजा कॅम्प संपण्यापूर्वी टीम इंडियात दाखल होईल. तो येत्या 4 दिवसांमध्ये टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये दाखल होणार असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. जडेजा बराच काळ बायो-बबलमध्ये राहिला आहे. त्यामुळे त्याला सध्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. बीसीसीआयनं देखील जडेजाची सुट्टी मंजुर केली आहे. या कॅम्पमधील सहभागी खेळाडूंसाठी वेगळे बायो-बबल बनवण्यात येणार नाही. कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: