• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Halal Furor: टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवर BCCI नं अखेर मौन सोडलं!

Halal Furor: टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवर BCCI नं अखेर मौन सोडलं!

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टेस्ट गुरूवारी कानपूरमध्ये सुरू होत आहे. ही टेस्ट सुरू होण्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाला आहे.

 • Share this:
  कानपूर, 24 नोव्हेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टेस्ट गुरूवारी कानपूरमध्ये सुरू होत आहे. ही टेस्ट सुरू होण्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय खेळाडूंच्या डाएट प्लॅनवरून (diet plan) हा वाद सुरू आहे. या विषयावर भारतीय फॅन्सनी बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर देखील #BCCI_Promotes_Halal  हा ट्रेंड चांगलाच गाजला. या सर्व वादानंतर अखेर बीसीसीआयनं (BCCI) स्पष्टीकरण दिलं आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ (BCCI treasurer Arun Dhumal) यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'डाएट प्लॅनवर कधीही चर्चा झालेली नाही तसंच तो आवश्यक करण्यात आलेला नाही. या प्रकराचा कोणताही निर्णय झाल्याचं मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे डाएट प्लॅनबाबत कोणतीही गाईडलाईन्स जाारी करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला काय खायंच आहे, याचं त्याला स्वातंत्र्य आहे. बीसीसीआय त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही.' असं धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे. 'हा हलालबाबतचा प्रकार एखाद्या खेळाडूच्या फिडबॅकनंतर आलेला असावा. उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूनं बीफ खाणार नसल्याचं सांगितलं असेल तसंच विदेशी टीम आल्यानंतर खाण्यात तो पदार्थ मिक्स करू नये याबाबतची सूचना देखील दिली असावी. बीसीसीआय कोणत्याही खेळाडूंना त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत सूचना करत नाही. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. या प्रकारचा डाएट प्लॅन शेअर करणे हे नवे नाही. एखादी पाहुणी टीम नेहमीच त्यांची सूरक्षा तसेच प्रवासाचे माध्यम याबाबतचे प्राधान्य यजमान टीमला कळवत असते. यामध्ये डाएट प्लॅन तसेच एखाद्या खास खाद्यपदार्थाची शिफारस याचाही समावेश असतो, असे ते यावेळी म्हणाले. दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी भारतीय टीमची धुलाई, सर्वात फास्ट बॉलरही फेल काय आहे वाद? टीम इंडियाचे खेळाडू कानपूरमध्ये हॉटेल लँडमार्क टॉवर येथील बायो-बबलमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय खेळाडूंसाठी फूड मेनूही जारी करण्यात आला आहे.बीसीसीआयने जारी केलेल्या डाएट प्लॅन नुसार, दिवसभर काउंटर, स्टेडियमवर छोटा नाश्ता, दुपारचे जेवण, चहाच्या वेळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश होतो. या मेनूमधून डुकराचे मांस आणि गोमांस वगळण्यात आले आहे. मांसाहारी पदार्थांमध्ये हलाल मांसाचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचे फॅन्स त्यामुळे भडकले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयविरोधात #BCCI_Promotes_Halal ही मोहीम सुरू केली आहे
  Published by:News18 Desk
  First published: