मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: माजी क्रिकेटपटूनं सांगितली रोहित शर्माच्या कॅप्टनसीमधील चूक

IND vs NZ: माजी क्रिकेटपटूनं सांगितली रोहित शर्माच्या कॅप्टनसीमधील चूक

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याच्या नव्या इनिंगची सुरूवात विजयानं केली आहे. पण, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूनं रोहितच्या कॅप्टनसीमधील एक चूक सांगितली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर : टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याच्या नव्या इनिंगची सुरूवात जोरदार केली आहे. बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं 5 विकेट्सनं (India vs New Zealand) विजय मिळवला. या मॅचमध्ये रोहितनं 36 बॉलमध्ये 48 रनची खेळी करत विजयाचा पाया रचला. टीम इंडियाच्या टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून रोहितची ही पहिलीच मॅच होती. असं असलं तरी भारतीय क्रिकेटमधील तो एक अनुभवी आणि यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं सर्वात जास्त 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

हुशार कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितची बुधवारच्या मॅचमध्ये झालेली एक चूक माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानं सांगितली आहे. टीम इंडियानं जयपूरच्या मॅचमध्ये व्यंकेटेश अय्यरला (Venkatesh Iyer) पदार्पणाची संधी दिली. यावर्षीची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) गाजवणाऱ्या अय्यरकडं हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. तो डाव्या हातानं बॅटींगसह मध्यमगती बॉलिंगही करू शकतो. पण, बुधवारच्या मॅचमध्ये अय्यरला बॉलिंग मिळाली नाही. रोहितनं फक्त 5 बॉलर्सचा वापर केला.

आकाश चोप्रानं त्याच्या युट्यूब चॅनलवर या मॅचचं विश्लेषण केलं आहे. यामध्ये त्यानं रोहितच्या चुकीवर बोट ठेवलं आहे. 'टीम इंडियाला एका फास्ट बॉलिंग ऑल राऊंडरची गरज आहे, असं सांगितलं जातं. त्यामुळेच व्यंकटेश अय्यरची निवड झाली आहे. तरीही त्याला बॉलिंग करण्याची संधी मिळाली नाही. माझ्या मते, ही रोहितच्या मोजक्या चुकांपैकी एक चूक आहे. सामान्यपणे त्याची कॅप्टनसी परफेक्ट असते, पण ही एक छोटी चूक झाली, असं म्हणता येईल.

2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर! न्यूझीलंडच्या खेळाडूचा अनोखा रेकॉर्ड

टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेतली असेल आणि समोरची टीम चाचपडत खेळत असेल तर त्याला आरामात 1-2 ओव्हर्स बॉलिंग देता आली असती. दीपक चहर आणि मोहम्मद सिराजचा दिवसही चांगला नव्हता.' याकडे आकाशनं यावेळी लक्ष वेधलं.

भुवनेश्वर कुमार आणि आर. अश्विन या दोन्ही अनुभवी बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली. विशेषत: भुवीनं नव्या आणि जुन्या बॉलसह चांगली कामगिरी केली ही आनंदाची गोष्ट असल्याचं आकाश यावेळी म्हणाला.

First published:

Tags: Cricket news, Rohit sharma, Team india