मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: 2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर! न्यूझीलंडच्या खेळाडूचा अनोखा रेकॉर्ड

IND vs NZ: 2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर! न्यूझीलंडच्या खेळाडूचा अनोखा रेकॉर्ड

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) फायनलपर्यंत धडक मारलेल्या न्यूझीलंडचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला आहे. मात्र या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूनं अनोखा रेकॉर्ड केला.

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) फायनलपर्यंत धडक मारलेल्या न्यूझीलंडचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला आहे. मात्र या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूनं अनोखा रेकॉर्ड केला.

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) फायनलपर्यंत धडक मारलेल्या न्यूझीलंडचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला आहे. मात्र या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूनं अनोखा रेकॉर्ड केला.

  • Published by:  News18 Desk

जयपूर, 18 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) फायनलपर्यंत धडक मारलेल्या न्यूझीलंडचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला आहे. जयपूरमध्ये बुधवारी झालेल्या टी20 मॅचमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली.  भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) मॅचच्या तिसऱ्या बॉललाच भुवनेश्वर कुमारने धोकादायक डॅरेल मिचेलला बोल्ड केलं. त्यानंतर अनुभवी मार्टीन गप्टील (Martin Guptil) आणि मार्क चॅपमन (Mark Chapman) यांनी इनिंग सावरली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 रनची पार्टनरशिप केली. या दोघांमध्ये चॅपमन अधिक आक्रमक होता. त्यानं 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 63 रन काढले. चॅपमनला अश्विननं आऊट केलं.

चॅपमन 63 रनवर आऊट होताच त्याच्या नावावर एका अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो आता दोन वेगवेगळ्या देशांकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. विशेष म्हणजे त्यानं दोन्ही वेळेस एकसमान 63 रन काढले आहेत. त्यानं पहिलं अर्धशतक हाँगकाँगकडून ओमान विरुद्ध झळकावलं होतं. त्यानं हाँगकाँगकडून 2014 साली टी20 क्रिकेटमध्ये तर 2015 साली वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला आणि आता न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीमचा सदस्य आहे.

चॅपमनच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंड 180 चा टप्पा ओलांडेल असं एकवेळेस वाटत होतं, पण तसं झालं नाही. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांनी टिच्चून बॉलिंग करत आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेत न्यूझीलंडला मोठा स्कोअर करण्यापासून रोखलं. भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 2 विकेट घेतल्या. अश्विनने 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. अश्विनने त्याची अखेरची ओव्हर असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये चॅपमनला 63 रनवर बोल्ड केलं, तर ग्लेन फिलिप्सला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

जयपूरच्या मॅचमध्ये कोरोना नियमांची ऐशीतैशी, प्रेक्षक विसरले मास्कचे बंधन आणि गाईडलाईन्सची काळजी

न्यूझीलंडने दिलेलं 165 रनचं आव्हान भारताने 5 विकेट्स आणि 2 बॉल राखून पार केले. या विजयाबरोबरच तीन टी20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियानं 1-0 नं आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील मॅच शुक्रवारी होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, New zealand