• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: द्रविड सरांच्या कोचिंगचं अश्विननं केलं वर्णन, म्हणाला...

IND vs NZ: द्रविड सरांच्या कोचिंगचं अश्विननं केलं वर्णन, म्हणाला...

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) मालिकेपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक झाला आहे

 • Share this:
  जयपूर, 18 नोव्हेंबर :टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) टी20 सीरिजची विजयानं सुरूवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या टी20 मॅचमध्ये भारतीय टीमनं 5 विकेट्सनं विजय मिळवला. याचबरोबर यजमान टीमनं 3 मॅचच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. या मालिकेपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन तर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक झाला आहे. रोहित-द्रविड जोडीनं विजयानं त्यांच्या नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) मॅच संपल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 'या पिचवर जितकी स्लो बॉलिंग कराल तितके रन जास्त पडतील. तुम्हाला बॉल बाऊन्स करता आला तर ते चांगलं ठरू शकतं. मिचेल स्टँनरनं तेच केलं. हे टी20 मध्ये थोडं अवघड आहे. न्यूझीलंडचा स्कोअर थोडा कमी होता. 180 पर्यंत टार्गेट मिळेल असं वाटलं होतं. हे टार्गेट 15 ओव्हर्सपर्यंत पूर्ण होईल असं वाटलं होतं, पण हे टी20 क्रिकेट आहे,' असं अश्विननं सांगितलं. अश्विनला यावेळी द्रविडच्या कोचिंवरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, 'माझ्यासाठी द्रविडच्या कोचिंग स्टाईलवर प्रतिक्रिया देणे घाईचं ठरेल. पण, त्यांनी अंडर-19 टीमचे कोच म्हणून खूप चांगली कामगिरी केली आहे. ते जास्त संधी सोडणार नाहीत. तसंच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण परत येईल यासाठी ते सर्व काही करतील,' असा विश्वास अश्विननं व्यक्त केला. IND vs NZ: दीपक चहरनं गप्टीलला दिला जबरदस्त लूक, VIDEO VIRAL अश्निनची चमकदार कामगिरी आर. अश्विननं पहिल्या टी20 मॅचमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यानं 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. अश्विनने त्याची अखेरची ओव्हर असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये चॅपमनला 63 रनवर बोल्ड केलं, तर ग्लेन फिलिप्सला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
  Published by:News18 Desk
  First published: