• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: न्यूझीलंडची शक्ती वाढली, टीम इंडियाला त्रास देण्यासाठी फास्ट बॉलर सज्ज

IND vs NZ: न्यूझीलंडची शक्ती वाढली, टीम इंडियाला त्रास देण्यासाठी फास्ट बॉलर सज्ज

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टी20 मॅच बुधवारी जयपूरमध्ये होत आहे. या मॅचपूर्वी न्यूझीलंडसाठी आनंदाची बातमी आहे.

 • Share this:
  जयपूर, 17 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टी20 मॅच बुधवारी जयपूरमध्ये होत आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सुपर 12 मध्ये संपुष्टात आलं होतं. तर न्यूझीलंडला फायनलमध्ये पुन्हा एकदा विजेतेपदानं हुलकावणी दिली. आता या स्पर्धेच्या आठवणी विसरत या सीरिजमध्ये उतरणार आहेत. जयपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टी20 मॅचपूर्वी पाहुण्या न्यूझीलंड टीमसाठी आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) फिट झाला असून पहिल्या मॅचमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. न्यूझीलंड टीमचे कोच गॅरी स्टीड (Gary Stead) यांनी ही माहिती दिली आहे. टी20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी फर्ग्युसन जखमी झाला होता. त्यामुळे तो या स्पर्धेत एकही मॅच खेळू शकला नव्हता. फर्ग्युसनकडं चांगला वेग आणि उत्तर यॉर्कर आहे. त्यामुळे तो टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. टी20 मालिकेत केन विल्यमसन (Kane Williamson) आणि कायले जेमीसन (Kyle Jamieson) यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर टीम साऊदी (Tim Sothee) काळजीवाहू कॅप्टन आहे. 'या मालिकेत पूर्ण टी20 टीमला मॅच टाईम मिळणार आहे. आम्ही खेळाडूंच्या कामांचे नियोजन करणार आहोत. विशेषत: टेस्ट मॅचचा विचार करून आमच्या त्या टीममधील खेळाडूंना पहिल्यांदा प्राथमिकता दिली जाणार आहे.' असे स्टीड यांनी सांगितले. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिज 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. या सीरिजसाठी रॉस टेलर आणि टॉम लॅथम हे सिनिअर खेळाडू मागच्या आठवड्यातच भारतामध्ये दाखल झाले आहेत. कायले जेमीसन टेस्ट सीरिजसाठी फिट राहावा म्हणून त्याला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. आगामी काळात आणखी काही खेळाडू देखील ही  सीरिज खेळणार नाहीत, याबबतचे अपडेट तुम्हाला समजतील. 5 दिवसांमध्ये तीन टी20 मॅच खेळणे आणि तीन वेगवेगळ्या शहरांची यात्रा करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे स्टीड यांनी मान्य केले. 100 वर्षांहून जास्त प्रतीक्षा संपणार! ICC च्या निर्णयामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्ग मोकळा कोहली-बुमराहशिवायही टीम इंडिया दमदार टीम इंडियातील अनेक प्रमुख खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा समावेश आहे. या दोन प्रमुख खेळाडूंशिवाय देखील टीम इंडिया दमदार असल्याचं  मत स्टीड यांनी व्यक्त केलं. 'राहुल द्रविड हा टीम इंडियाचा नवा कोच झाला आहे. नव्या कोचला प्रभावित करण्यासाठी आणि टीममधील जागा मजबूत करण्यासाठी खेळाडू प्रयत्न करतील याची मला कल्पना आहे. टीम इंडिया मजबूत आहे. ती या मालिकेत आम्हाला तगडं आव्हान देईल. त्यामुळे आम्हाला सकारात्मक राहावं लागेल,' असं त्यांनी स्पष्ट केले.
  Published by:News18 Desk
  First published: