मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: टीम इंडियाच्या बॉलर्सचा धडाका, न्यूझीलंडवर Follow On चा धोका

IND vs NZ: टीम इंडियाच्या बॉलर्सचा धडाका, न्यूझीलंडवर Follow On चा धोका

मुंबई टेस्टमध्ये एजाझ पटेलनं (Ajaz Patel) एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत. एजाझच्या या ऐतिहासिक कामगिरीचा फायदा न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरला उठवता आला नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 डिसेंबर : मुंबई टेस्टमध्ये एजाझ पटेलनं (Ajaz Patel)  सर्व 10 विकेट्स घेतल्यानं टीम इंडियाची पहिली इनिंग 325 रनवर ऑल आऊट झाली. एजाझच्या या ऐतिहासिक कामगिरीचा फायदा न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरला उठवता आला नाही. त्यांची सपशेल निराशा केली. टीम इंडियाच्या बॉलिंगपुढे त्यांची दाणादाण उडाली आहे. न्यूझीलंडच्या 8 विकेट्स गेल्या आहेत. त्यामुळे पाहुण्या टीमवर फॉलो ऑनचा (Follow On) धोका वाढला आहे.

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) विल यंगला (Will Young) फक्त 4 रनवर आऊट केले. त्यानंतर सिराजनंच या टेस्टमधील न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमला (Tom Latham) आऊट करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. कानपूर टेस्टमध्ये खेळायची संधी न मिळालेल्या सिराजनंच न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. त्यानं अनुभवी रॉस टेलरला मैदानात स्थिर होऊ दिलं नाही.

सिराजनं 3 विकेट्स घेतल्यानंतर भारतीय स्पिनर्सनी न्यूझीलंडला हादरे दिले. अक्षर पटेल (Axar Patel), आर. अश्विन (R. Ashwin) आणि जयंत यादव (Jayant Yadav) या तिन्ही स्पिनर्सनी प्रत्येकी एक विकेट्स घेत न्यूझीलंडची अवस्था 6 आऊट 38 अशी केली. टी टाईमनंतर अश्विननं आणखी दोन विकेट्स घेत न्यूझीलंडला संकटात टाकलं आहे. न्यूझीलंडला फॉलो ऑन पासून वाचण्यासाठी या इनिंगमध्ये 126 रन करणे आवश्यक आहे.

त्यापूर्वी न्यूझीलंडचा डावखुरा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) मुंबई टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यानं सर्व 10 विकेट्स एकात इनिंगमध्ये घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा तो फक्त तिसरा बॉलर आहे. यापूर्वी इंग्लंडच्या जिम लेकर (Jim Laker) आणि टीम इंडियाच्या अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी ही कामगिरी केली आहे.

IND vs NZ: एजाझ पटेलनं बरोबरी केल्यानंतर अनिल कुंबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

जिम लेकरनं 1956 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 43 वर्षांनी म्हणजेच 1999 साली अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर 23 वर्षांनी पटेलनं या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

First published: