गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये सतत पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या प्रॅक्टीसलाही याचा फटका बसला आहे. कानपूर टेस्टमध्ये श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) दमदार शतक झळकावले होते. त्यानंतर तो आता होम ग्राऊंडवर टेस्ट मॅच खेळणार आहे. त्याच्याकडून टीम इंडियाला मोठी आशा असेल. त्याचबरोबर भारतीय स्पिनर्सवरही विराट कोहलीची मोठी भिस्त असणार आहे. कानपूर टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये न्यूझीलंडचा ओपनिंग बॅटर टॉम लॅथमनं (Tom Latham) अर्धशतक झळकावले होते. तसंच टीम साऊदी आणि कायले जेमिसन यांनी प्रभावी मारा केला होता. भारतीय टीमच्या विजयाच्या मार्गात या तिघांचा अडथळा असणार आहे. IND vs NZ: मुंबईत पाऊस नसूनही टेस्ट मॅचचा टॉस का लांबला? अंपायरनं सांगितलं कारण दोन्ही टीमच्या प्लेईंग 11 टीम इंडिया : शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा, जयंत यादव आर. अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज न्यूझीलंड: टॉम लॅथम (कॅप्टन) विल यंग, डॅरेल मिचेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रविंद्र, कायले जेमिसन, टीम साऊदी, विल्यम सोमरविले एजाज पटेल#TeamIndia's Playing XI for the 2nd Test against New Zealand. Live - https://t.co/KYV5Z1jAEM #INDvNZ @Paytm pic.twitter.com/A7LecZbGeO
— BCCI (@BCCI) December 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Team india, Virat kohli