Home /News /sport /

IND vs NZ: एजाझ पटेलनं बरोबरी केल्यानंतर अनिल कुंबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IND vs NZ: एजाझ पटेलनं बरोबरी केल्यानंतर अनिल कुंबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मुंबई टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलच्या (Ajaz Patel) कामगिरीवर अनिल कुंबळेनी (Anil Kumble) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 4 डिसेंबर: न्यूझीलंडचा डावखुरा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) मुंबई टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यानं सर्व 10 विकेट्स एकात इनिंगमध्ये घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा तो फक्त तिसरा बॉलर आहे. यापूर्वी इंग्लंडच्या जिम लेकर (Jim Laker) आणि टीम इंडियाच्या अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जिम लेकरनं 1956 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 43 वर्षांनी म्हणजेच 1999 साली अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर 23 वर्षांनी पटेलनं या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. एजाझच्या या कामगिरीवर अनिल कुंबळेनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एजाझ पटेलनं मोहम्मद सिराजला आऊट करत एका इनिंगमध्ये 10 विकेट्स पूर्ण केल्या. त्यानंतर त्याच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनिल कुंबळेनंही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे.  'एजाझ पटेलचं स्पेशल क्लबमध्ये स्वागत. टेस्ट मॅचच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बॉलिंग करुन हा विक्रम करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.' या शब्दात कुंबळेनं त्याचं अभिनंदन केलं आहे. एजाझनं पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 4 विकेट्स घेतल्या होत्या. शनिवारी सकाळी त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये ऋद्धीमान साहा आणि आर. अश्विनला आऊट केले. त्यानंतर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि अक्षर पटेल (Axar Patel) जोडीनं संयमी खेळ करत त्याला लंचपर्यंत विकेट घेऊ दिली नाही. IND vs NZ: अनिल कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी! एजाझ पटेलनं घेतल्या सर्व 10 विकेट्स लंचनंतर एजाझनं धडाका लावला. त्यानं सर्वप्रथम मयांकला आऊट केलं. ओपनिंगला आलेल्या मयांकनं एक बाजू लावून धरत 150 रन काढले. त्यानंतर अक्षर पटेलला आऊट करत टीम इंडियाला आठवा धक्का दिला. जयंत यादवलाही त्यानं परत पाठवलं. त्यावेळी एजाझ विक्रमाच्या अगदी उंबरठ्यावर होता. मोहम्मद सिराजनं त्याला फार वाट पाहयला लावली नाही. एजाजच्या रचिन रविंद्रनं त्याचा कॅच घेत 'पर्फेक्ट टेन' चा रेकॉर्ड पूर्ण केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, New zealand, Team india

    पुढील बातम्या