Home /News /sport /

IND vs NZ: मुंबईकरचा टीम इंडियाला पुन्हा तडाखा, पहिल्याच ओव्हरमध्ये दिले 2 धक्के

IND vs NZ: मुंबईकरचा टीम इंडियाला पुन्हा तडाखा, पहिल्याच ओव्हरमध्ये दिले 2 धक्के

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात धक्कादायक झाली आहे.

    मुंबई, 4 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात धक्कादायक झाली आहे. भारतीय टीमनं 4 आऊट 221 या धावसंख्येवरुन पुढे खेळण्या सुरूवात केली. पहिल्या दिवशी टीम इंडियाला तडाखा दिलेल्या मुंबईकर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) दुसऱ्या दिवशीही हादरे दिले. त्यानं त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला दोन धक्के दिले. एजाजनं सुरुवातीला ऋद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) आऊट करत मुंबई टेस्टमध्ये पाच विकेट्स पूर्ण केल्या. साहानं 27 रन काढले. त्यानंतर पटेलनं लगेच पुढच्या बॉलवर आर. अश्विनला आऊट करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. अक्षर पटेलनं (Axar Patel) त्याची हॅट्ट्रिक चुकवली. एजाझनं पहिल्या दिवशी 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं दुसऱ्या दिवशीही  दमदार खेळ सुरू ठेवला आहे. मुंबईमध्ये 21 ऑक्टोबर 1988 रोजी जन्मलेला पटेल वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत भारतामध्येच होता. पण नंतर कुटुंबासोबत न्यूझीलंडला स्थायीक झाला. सुरुवातीला तो डावखुरा फास्ट बॉलर होता, पण काही काळानंतर त्याने स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली. IPL 2022: विराट कोहलीचा कॅप्टन होणार 'या' आयपीएल टीमचा हेड कोच! एजाझ पटेलने 2018 साली टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं, पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात एजाजने 7 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. एजाझ पटेल आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. एजाझ पटेलने आतापर्यंत 11 टेस्टमध्ये 30.51 च्या सरासरीने 33 विकेट घेतल्या आहेत. याआधी कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही एजाझ पटेलने टीम इंडियाच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेतला. कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाला विजयासाठी एका विकेटची गरज होती, पण एजाझ पटेलने रचीन रविंद्रच्या मदतीने अखेरच्या विकेटसाठी 52 बॉल किल्ला लढवला आणि न्यूझीलंडला मॅच ड्रॉ करण्यात यश आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, New zealand, Team india

    पुढील बातम्या