• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: डिव्हिलियर्सच्या 'त्या' सल्ल्यानं बदललं आयुष्य, 'मॅन ऑफ द मॅच' हर्षल पटेलनं सांगितलं रहस्य

IND vs NZ: डिव्हिलियर्सच्या 'त्या' सल्ल्यानं बदललं आयुष्य, 'मॅन ऑफ द मॅच' हर्षल पटेलनं सांगितलं रहस्य

आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलनं (Harshal Patel) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात चांगली केली आहे.

 • Share this:
  रांची, 20 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलनं (Harshal Patel) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात चांगली केली आहे. त्यानं पदार्पणातील मॅचमध्येच 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार मिळवला आहे. या यशानंतर हर्षलनं आपण टॅलेंटेड खेळाडू नाही, तर हळू-हळू प्रगती केल्याचं सांगितलं. त्याचबरोबर डिव्हिलियर्सच्या (AB de Villiers) सल्ल्यानंतर आपलं आयुष्य कसं बदललं याचाही खुलासा केला आहे. रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये हर्षलला जखमी मोहम्मद सिराजच्या जागी (Mohammed Siraj) प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. माजी फास्ट बॉलर अजित आगरकरनं मॅचपूर्वी डेब्यू कॅप दिली. हर्षलनं पहिल्याच मॅचमध्ये जोरदार बॉलिंग केली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 25 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावल्यानंतर हर्षलनं त्याच्या आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतला. 'यापेक्षा चांगल्या पदार्पणाची मला अपेक्षा नव्हती. मी टॅलेंटेड खेळाडू नाही. मी ग्राऊंड लेव्हलपासून स्वत:ला तयार केलं आहे. त्यामुळे माझी गती थोडी कमी होती. मी चुका केल्या आहेत. मी काय करू शकतो आणि काय नाही, हे तपासलं आहे. हा एक चांगला प्रवास होता. क्रिकेटनं मला खूप काही शिकवलं आहे.' हर्षलनं त्याच्या यशाचं श्रेय एबी डिव्हिलियर्सला दिलं. 'IPL 2021 सुरू होण्यापूर्वी मी डिव्हिलियर्सशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यानं मला बॅटर्सला चांगल्या बॉलवर फटका मारू दे त्यानंतरच तुला विकेट मिळेल असा सल्ला दिला होता. चांगल्या बॉलवर फोर गेल्यानंतर बॉलर त्याचा पुढच्या बॉलमध्ये बदल करतो. ही मोठी चूक आहे. तू बॉलरला खराब नाही तर चांगल्या बॉलवर फटका मारण्याचं आमंत्रण दे, तुला यामधूनच विकेट मिळेल.' असा डिव्हिलियर्सनं सल्ला दिल्याचं हर्षलनं सांगितलं. रोहित शर्मानं एकाच मॅचमध्ये केले 6 मोठे रेकॉर्ड, विराट आणि बाबरची केली बरोबरी टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसऱ्यांदा टी20 मालिका जिंकली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी कोलकातामध्ये होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: