• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: 1600 रन करणाऱ्या KKR च्या खेळाडूकडं निवड समितीचं दुर्लक्ष, हरभजननं विचारला तिखट प्रश्न

IND vs NZ: 1600 रन करणाऱ्या KKR च्या खेळाडूकडं निवड समितीचं दुर्लक्ष, हरभजननं विचारला तिखट प्रश्न

बीसीसीआयनं एक दिवसापूर्वीच न्यूझीलंड विरुद्धच्या 3 टी20 मॅचच्या सीरिजसाठी (IND vs NZ T20 Series) टीम इंडियाची आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठा इंडिया 'ए' (India A) टीमची घोषणा केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर: बीसीसीआयनं एक दिवसापूर्वीच न्यूझीलंड विरुद्धच्या 3 टी20 मॅचच्या सीरिजसाठी  (IND vs NZ T20 Series) टीम इंडियाची आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठा इंडिया 'ए' (India A) टीमची घोषणा केली आहे. या दोन्ही टीममध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर रन करणाऱ्या खेळाडूकडं दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) बीसीसीआयला प्रश्न विचारला आहे. सौराष्ट्रचा बॅटर शेल्डन जॅक्सनची (Sheldon Jackson) निवड न झाल्यानं हरभजन संतापला आहे. त्यानं ट्विट करत बीसीसीआयला प्रश्न विचारला आहे. '2018-19 च्या रणजी सिझनमध्ये 854 आणि 2019-20 च्या सिझनमध्ये 809 रन काढून त्यानं टीमला चॅम्पियन बनवलं. तो या सिझनमध्येही फॉर्मात आहे. तरीही इंडिया 'ए' च्या टीममध्येही त्याची निवड झाली नाही. जॅक्सननं अजून काय केलं पाहिजे हे निवड समिती त्याला सांगेल का?' असा प्रश्न हरभजननं ट्विट करत विचारला आहे. जॅक्सनच्या निवडीत अडथळा काय? न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये निवड समितीनं भविष्याचा विचार करत तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. जॅक्सन सध्या 35 वर्षांचा आहे. त्यामुळे वय हा जॅक्सनसाठी अडथळा ठरला आहे. असं असलं तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, ते पाहता निवड समितीला प्रश्न विचारले जाणे हे स्वाभाविक आहे. IPL गाजवणाऱ्या 3 खेळाडूंना टीम इंडियात पहिल्यांदाच संधी, न्यूझीलंडची घेणार परीक्षा मुश्ताक अली स्पर्धेतही दमदार फॉर्म सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही जॅक्सन फॉर्मात आहे. त्यानं मागील तीन इनिंगमध्ये 62, 70 आणि 79 रनची खेळी केली असून यापैकी 2 वेळा तो नाबाद परतला आहे. जॅक्सननं 60 लिस्ट ए मॅचमध्ये 2096 रन काढले आहेत. तर 64 टी20 मॅचमध्ये 121 च्या स्ट्राईक रेटनं 1461 रन काढले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: