• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: दुसऱ्या टी20 बाबत मोठी अपडेट, मॅच स्थगितीबाबत हायकोर्टानं दिला निर्णय

IND vs NZ: दुसऱ्या टी20 बाबत मोठी अपडेट, मॅच स्थगितीबाबत हायकोर्टानं दिला निर्णय

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टी20 मॅच आज (शुक्रवार) रांचीमध्ये होणार आहे. ही मॅच रद्द करावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.

 • Share this:
  रांची, 19 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी टी20 मॅच आज (शुक्रवार) रांचीमध्ये होणार आहे. जयपूरमध्ये झालेली पहिली टी20 मॅच जिंकत टीम इंडियानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता रांचीमधील मॅच जिंकत मालिका जिंकण्याचं टीम इंडियाचं ध्येय आहे. या मॅचसाठी प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह आहे. त्याचवेळी ही मॅच रद्द करावी अशी याचिका झारखंड उच्च न्यायालयात (Jharkhand high court) दाखल करण्यात आली होती. कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता ही मॅच रद्द करण्यात यावी अथवा या मॅचसाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेपैकी 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावर ही आंतरराष्ट्रीय मॅच आहे. तसंच याबाबतची सर्व तयारी आता झाली आहे, असं कारण देत कोणतेही निर्देश न देता उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश डॉ. रवी रंजन आणि न्या. सूजित नारायण प्रसाद यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.  या निर्णयामुळे शुक्रवारी होणाऱ्या मॅचचा मार्ग मोकळा झाला आहे. काय आहे रांचीमध्ये इतिहास? टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) रांची गावातील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आजवर 2 टी20 इंटरनॅशनल मॅच झाल्या आहे. यापूर्वी 2017 साली झालेल्या मॅचला पावसाचा फटका बसला होता. टीम इंडियानं ती मॅच डकवर्थ लुईस पद्धतीनं जिंकली होती. तर 2016 साली झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेवर 69 रननं विजय मिळवला होता. रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा, 'Team Indiaच्या हेड कोचची मिळाली होती ऑफर' भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात बुधवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं 5 विकेट्सनं विजय मिळवला. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे या विजयाचे हिरो ठरले. रोहितनं 48 तर सूर्यकुमारनं 62 रनची खेळी केली.
  Published by:News18 Desk
  First published: