भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2017 10:53 PM IST

भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

25 आॅक्टोबर : भारताने दमदार खेळाच्या जोरावर दुसऱ्या वनडे सामन्यात न्युझीलंडचा 6 विकेट्सने पराभव केलाय. या विजयासह भारताने सिरीजमध्ये 1-1 ने बरोबरी साधलीये.

न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करत 230 रन्सचं टार्गेट दिलं. 230 धावांचं माफक आव्हान भारताने शिखऱ धवन 68 तर दिनेश कार्तिकच्या नाबाद 64 रन्सच्या खेळीवर बळावर 46 व्या ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. मात्र, भारताची सुरुवात खराब राहिली. रोहित शर्मा 7 रन्स करून झटपट आऊट झाला. तर कॅप्टन 29 रन्स करून माघारी परतला.

त्यानंतर कार्तिक आणि शिखर धवनने टीम इंडियाचा कमान सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 रन्स केले. शिखर धवन 68 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर कार्तिकने हार्दिक पांड्यासोबत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.  महेंद्र सिंग धोणीने नाबाद 18 रन्सची खेळी करून औपचारिकता पूर्ण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 10:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...