मुंबई, 28 नोव्हेंबर : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) खेळवण्यात आलेली दुसरी वन-डे मॅच पावसामुळे रद्द झाली. यजमान किवी टीम तीन मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. 30 नोव्हेंबर रोजी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय टीम सीरिजमधील शेवटची मॅच खेळणार आहे. ही मॅच जिंकून सीरिजमध्ये बरोबरी साधण्याच्या उद्दिष्टानं भारतीय टीम मैदानात उतरेल.
या दौऱ्यानंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तिथे टीम तीन मॅचेसची वन-डे सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल होणार आहेत. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले आठ खेळाडू बांगलादेशला जाणार नाहीत. कारण, नियमित कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करणार आहेत.
रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्यात आली होती. आता, के. एल. राहुल आणि विराट कोहलीसह इतर खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये खेळताना दिसणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी गेलेले शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीपसिंग आणि उमरान मलिक यांना बांगलादेश दौऱ्यासाठी टीममध्ये स्थान मिळालेलं नाही.
मॅच न खेळताच टीम इंडिया हरणार वन डे सीरीज? समोर आली ही मोठी अपडेट
कुणावर लक्ष?
रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी या दोन युवा क्रिकेटपटूंना बांगलादेश दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. या दोघांनी देशांतर्गत स्पर्धेच्या चालू मोसमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ईशान किशन हा ऋषभ पंतसोबत विकेटकीपरच्या भूमिकेत दिसणार आहे.
या दौऱ्यातून फास्ट बॉलर कुलदीप सेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. स्पिनर म्हणून शाहबाज अहमद, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संधी मिळू शकते. वन-डे सीरिजमधील मॅच 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी खेळवल्या जाणार आहेत. यानंतर दोन्ही टीम 2 टेस्ट मॅचेस खेळतील. त्यातूनही खेळाडूंची कामगिरी तपासली जाईल.
खरंच विराट रिटायर्ड होणार? विराटची 'ती' पोस्ट पाहून चाहत्यांच्या काळजात झालं धस्स!
बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय वन-डे टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाइस कॅप्टन), श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, ऋषभ पंत, ईशान किशन ( दोघं विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप सेन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Cricket news, Team india