• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ: रोहित शर्मानं टी20 मॅच दरम्यान सिराजला मारलं, VIDEO VIRAL

IND vs NZ: रोहित शर्मानं टी20 मॅच दरम्यान सिराजला मारलं, VIDEO VIRAL

पहिल्या टी20 मॅचमध्ये न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव केला. आता दुसरी टी20 मॅच रांचीमध्ये होणार आहे. जयपूरमध्ये बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मोहम्मद सिराजचा (Mohammed siraj) प्लेईंग 11 मध्ये समावेश होता.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर: रोहित शर्मानं (Rohit Sharma) टी20 टीमचा कॅप्टन म्हणून विजयानं सुरूवात केली आहे. टीम इंडियानं (Team India) पहिल्या टी20 मॅचमध्ये न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव केला. आता दुसरी टी20 मॅच रांचीमध्ये होणार आहे.  जयपूरमध्ये बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मोहम्मद सिराजचा (Mohammed siraj) प्लेईंग 11 मध्ये समावेश होता. रोहित आणि सिराजचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओक रोहितनं सिराजच्या डोक्यावर मारलं आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज हे तिघेही टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये काही तरी चर्चा करत होते. यावेळी त्यांची परस्परांमध्ये थट्टा-मस्करी सुरू होती. त्यावेळी रोहितनं सिराजच्या डोक्यावर मारलं. हा एकूणच काही तरी मजेदार प्रसंग असल्याचं दिसत आहे. जयपूरमधील मॅचमध्ये रोहित शर्मानं 48 रन काढले होते. ही मॅच शेवटच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेत आली होती. अखेर ऋषभ पंतनं (Rishabh Pant) चौकार लगावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जयपूरमधील टी20 मध्ये सिराज महागडा ठरला. त्यानं 4 ओव्हरमध्ये 39 रन दिले आणि एक विकेट घेतली. ही सिराजची चौथीच टी20 इंटरनॅशनल मॅच होती. त्यानं यामध्ये 4 विकेट्स घेतल्या आहे. सिराजनं यावर्षीच्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) 15 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट 6.78 होता. जो टी20 चा विचार करता चांगला आहे. सिराजनं एकूण आयपीएल कारकिर्दीमधील 50 मॅचमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत. IND vs NZ 2nd T20 LIVE Streaming: दुसरी T20 कधी आणि कुठे पाहता येणार? जयपूरमध्ये झालेल्या टी20 मध्ये मिचेल सँटनरचा फटका अडवण्याच्या प्रयत्नात सिराजच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे रांचीमधील मॅचमध्ये त्याचे खेळणे अनिश्चित आहे. सिराजच्या जागी खेळण्यासाठी हर्षल पटेल आणि आवेश खान हे दोन पर्याय टीम इंडियाकडं आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: