मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: दीपक चहरनं गप्टीलला दिला जबरदस्त लूक, VIDEO VIRAL

IND vs NZ: दीपक चहरनं गप्टीलला दिला जबरदस्त लूक, VIDEO VIRAL

गप्टीलनं न्यूझीलंडकडून सर्वात जास्त 70 रन काढले. 18 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिक्स बसल्यानंतर पुढच्याच बॉलवर चहरनं गप्टीलला आऊट केलं. गप्टील आऊट झाल्यानंतरचा चहरचा लूक सध्या व्हायरल होत आहे.

  • Published by:  News18 Desk

जयपूर, 18 नोव्हेंबर: टीम इंडियाच्या टी20 टीमचा नवा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharama) कॅप्टनसीची सुरूवात विजयानं केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात बुधवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं 5 विकेट्सनं विजय मिळवला. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे या विजयाचे हिरो ठरले.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहर  (Deepak Chahar) या मॅचमध्ये महागडा ठरला. त्यानं 4 ओव्हरमध्ये 44 रन दिले. त्यानं एकमेव विकेट मार्टीन गप्टीलची (Martin Guptill) घेतली. गप्टीलनं न्यूझीलंडकडून सर्वात जास्त 70 रन काढले. 18 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिक्स बसल्यानंतर पुढच्याच बॉलवर चहरनं गप्टीलला आऊट केलं. गप्टील आऊट झाल्यानंतरचा चहरचा लूक सध्या व्हायरल होत आहे.

गप्टीलनं चहरला पहिल्या बॉलवर सिक्स लगावल्यानंत रोखून पाहिलं होतं. त्यानंतर चहरनं पुढच्याच बॉलवर गप्टीलला आऊट करत त्याचा बदला घेतला. यावेळी चहरनं दिलेला लुक हा मॅमधील कमाल क्षण ठरला. त्याला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जयपूरमधील मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 164 रन केले होते.

न्यूझीलंडने दिलेलं 165 रनचं आव्हान भारताने 19.4 ओव्हरमध्येच पार केलं. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 62 रन, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 48 रन आणि ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद 17 रनच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यापूर्वी भुवनेश्वर कुमार आणि आर. अश्विननं टीम इंडियाकडून प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या विजयाबरोबरच तीन टी20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियानं 1-0 नं आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील मॅच शुक्रवारी होणार आहे.

VVS लक्ष्मण भारतीय क्रिकेटसाठी करणार मोठा त्याग! वाचून वाटेल अभिमान

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india