मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: इंग्लंडच्या क्रिकेटपटूची विराटवर जहरी टीका, फॅन्सनं शाळा घेताच मारली पलटी

IND vs ENG: इंग्लंडच्या क्रिकेटपटूची विराटवर जहरी टीका, फॅन्सनं शाळा घेताच मारली पलटी

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) आक्रमकता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटनला (Nick Compton) चांगलीच झोंबली होती. त्याने ट्विट करत विराटवर टीका केली होती

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) आक्रमकता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटनला (Nick Compton) चांगलीच झोंबली होती. त्याने ट्विट करत विराटवर टीका केली होती

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) आक्रमकता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटनला (Nick Compton) चांगलीच झोंबली होती. त्याने ट्विट करत विराटवर टीका केली होती

मुंबई, 19 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्टच्या (India vs England Lords Test) दरम्यान दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये वाद झाला होता. पिचवर पळणारा इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसनची (James Anderson) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं चांगलीच शाळा घेतली होती. 'हे पिच आहे, हवं तिथं पळायला तुझं घर नाही.' या शब्दात विराटनं अँडरसनला सुनावलं होतं.

विराट कोहलीची ही आक्रमकता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटनला  (Nick Compton) चांगलीच झोंबली होती. त्याने ट्विट करत विराटवर टीका केली होती. विराटवर केलेल्या टीकेनंतर भारतीय फॅन्सनी कॉप्टनला आरसा दाखवला. त्यामुळे कॉम्पटनवर पलटी मारत ट्विट डिलिट करण्याची वेळ आली.

कॉम्पटननं 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यानं विराटची तुलना सचिन तेंडुलकर, केन विल्यमसन आणि जो रूट यांच्याशी केली होती. 'विराट कोहली सर्वात जास्त आक्षेपार्ह वागणारा व्यक्ती नाही? मी 2012 साली झालेली शिवीगाळ कधीही विसरणार नाही. त्यावेळी मला धक्का बसला होता. कारण विराटनं सर्व सीमा ओलांडल्या होत्या. त्यामुळे जो रूट, सचिन तेंडुलकर आणि केन विल्यमसन हे किती शांत स्वभावाचे खेळाडू आहेत, हे आणखी ठळक होते.' असं ट्विट कॉम्पटननं केलं होतं.

विराट कोहलीच्या फॅन्सना कॉम्पटनची टीका आवडली नाही. त्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं. इंग्लंड क्रिकेटपटूंनी यापूर्वी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यानंतर कॉम्पटननं हे ट्विट डिलिट केलं. पण तो पर्यंत हा सर्व प्रकार व्हायरल झाला होता.

लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट आणखी आक्रमक झाला होता. दुसऱ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी भारताने इंग्लंडला 272 रनचं आव्हान दिलं. यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली तेव्हा टीमचं हडल झालं. या हडलमध्ये विराटने भारतीय खेळाडूंचा जोश वाढवला. 60 ओव्हरमध्ये उत्कृष्ट फिल्डिंग करण्याचं विराटने खेळाडूंना सांगितलं.

IND vs ENG: विराट कोहलीच्या जागेवर रोहित शर्माचा दावा, इतिहास रचण्याची हिटमॅनला संधी

'जर मला मैदानात कोणी हसताना दिसलं तर बघा. या 60 ओव्हमध्ये तुम्हाला जीव तोडून फिल्डिंग करायची आहे,' असं विराट टीम हडलमध्ये म्हणाला. विराट कोहलीचे हे शब्द टीम इंडियाच्या खेळाडूंचा जोश वाढवायला फायदेशीर ठरले.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Virat kohli