मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 'बापू थारी बॉलिंग...’ विराटनं अक्षरचं गुजरातीमधून केलं कौतुक, पाहा VIDEO

IND vs ENG : 'बापू थारी बॉलिंग...’ विराटनं अक्षरचं गुजरातीमधून केलं कौतुक, पाहा VIDEO

अक्षर पटेल (Axar Patel) हा टीम इंडियाच्या अहमदाबाद टेस्टमधील विजयाचा हिरो होता. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) अक्षरचं चक्क गुजरातीमधून कौतुक केलं आहे.

अक्षर पटेल (Axar Patel) हा टीम इंडियाच्या अहमदाबाद टेस्टमधील विजयाचा हिरो होता. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) अक्षरचं चक्क गुजरातीमधून कौतुक केलं आहे.

अक्षर पटेल (Axar Patel) हा टीम इंडियाच्या अहमदाबाद टेस्टमधील विजयाचा हिरो होता. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) अक्षरचं चक्क गुजरातीमधून कौतुक केलं आहे.

    अहमदाबाद, 26 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)  यांच्यात अहमदाबादमध्ये झालेली तिसरी टेस्ट भारतानं दहा विकेट्सनं जिंकली. भारताचा स्पिनर आणि अहमदाबादचा स्थानिक खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) हा या विजयाचा मुख्य हिरो होता. अक्षरनं या टेस्टमध्ये 70 रन देत 11 विकेट्स घेतल्या. त्याबद्दल त्याचं संपूर्ण क्रिकेट विश्वातून कौतुक होत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली देखील यामुळे चांगलाच आनंदी आहे. त्यानं अक्षरच्या बॉलिंगचं चक्क गुजरातीमधून कौतुक केलं आहे. काय म्हणाला विराट? अहमदाबाद टेस्ट संपल्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अक्षर पटेलची मुलाखत घेत होता. त्यावेळी अचानक विराट कोहलीनं त्या मुलाखतीमध्ये प्रवेश केला. ‘बापू (अक्षर) थारी बॉलिंग कमाल छे!’, म्हणजेच बापू (अक्षर) तुझी बॉलिंग कमाल आहे, असं विराटनं म्हंटलं. विराटचं हे वाक्य ऐकताच तिघंही हसू लागले. यानंतर विराट हल्लीच गुजराती शिकत असल्याची नवी माहिती हार्दिकनं दिली. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. DO NOT MISS: @hardikpandya7 interviews man of the moment @akshar2026.👍👍 - By @RajalArora P.S.: #TeamIndia skipper @imVkohli makes a special appearance 😎@Paytm #INDvENG #PinkBallTest Watch the full interview 🎥 👇 https://t.co/kytMdM4JzN pic.twitter.com/QLJWMkCNM5 — BCCI (@BCCI) February 26, 2021 भारताचा डावखुरा स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) याने टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार पाऊल टाकलं आहे. करियरच्या दुसऱ्याच टेस्टमध्ये अक्षर पटेल जगातला सगळ्यात घातक बॉलर झाला आहे. अहमदाबादमध्ये 11 विकेट घेत अक्षरने अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले आहेत. ( वाचा : IND vs ENG : तिसऱ्या टेस्टचा निकाल दुसऱ्याच दिवशी, टीम इंडियाचा दणदणीत विजय ) अक्षर पटेलने अहमदाबादच्या डे-नाईट टेस्टमध्ये एकूण 11 विकेट घेतल्या. डे-नाईट टेस्टमध्ये एवढ्या विकेट घेणारा अक्षर पटेल जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. अक्षर पटेलने पहिल्या इनिंगमध्ये 38 रन देऊन 6 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 32 रन देऊन 5 विकेट मिळवल्या. आपल्या करियरच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये तीनवेळा पाच विकेट घेणारा अक्षर पटेल दुसरा भारतीय बॉलर बनला आहे. याआधी नरेंद्र हिरवानी यांनी हा विक्रम केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmedabad, Axar patel, Funny video, India vs england, IPL 2021, Mumbai, Sports, Virat kohli

    पुढील बातम्या