मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : चार मॅचमध्ये फक्त एक रन काढणाऱ्या राहुल बद्दल विराटचं मोठं वक्तव्य!

IND vs ENG : चार मॅचमध्ये फक्त एक रन काढणाऱ्या राहुल बद्दल विराटचं मोठं वक्तव्य!

भारताचा सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) बॅट गेल्या काही मॅचपासून शांत आहे. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG)  पाच मॅचच्या टी 20 मालिकेतील पहिल्या तीन मॅचमध्ये त्याला दोन आकडी रन काढण्यात अपयश आलं आहे.

भारताचा सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) बॅट गेल्या काही मॅचपासून शांत आहे. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) पाच मॅचच्या टी 20 मालिकेतील पहिल्या तीन मॅचमध्ये त्याला दोन आकडी रन काढण्यात अपयश आलं आहे.

भारताचा सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) बॅट गेल्या काही मॅचपासून शांत आहे. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) पाच मॅचच्या टी 20 मालिकेतील पहिल्या तीन मॅचमध्ये त्याला दोन आकडी रन काढण्यात अपयश आलं आहे.

अहमदाबाद, 17 मार्च : भारताचा सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) बॅट गेल्या काही मॅचपासून शांत आहे. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG)  पाच मॅचच्या टी 20 मालिकेतील पहिल्या तीन मॅचमध्ये त्याला दोन आकडी रन काढण्यात अपयश आलं आहे. तीन पैकी दोन मॅचमध्ये तर तो खातं देखील उघडू शकला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये राहुल शून्यावर आऊट झाला आहे.

राहुलने मागच्या चार टी20 मॅचमध्ये फक्त 1 रन काढला आहे. तरी देखील कॅप्टन कोहलीचा त्याला भक्कम पाठिंबा आहे. तिसऱ्या मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतर कोहलीनं राहुलला चॅम्पियन खेळाडू म्हटलं आहे. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्मासोबतच भारतीय इनिंगची सुरुवात करण्यासाठी राहुलच पहिली पंसती असेल.

विराट यावेळी म्हणाला की, 'हा फक्त काही बॉलचा प्रश्न आहे. माझा देखील दोन दिवसांपूर्वी खराब फॉर्म होता. राहुल आमच्यासाठी ओपनिंगला महत्त्वाचा खेळाडू आहे. या फॉरमॅटमध्ये फक्त 5 ते 6 बॉलचा प्रश्न आहे.'

केएल राहुलला पहिल्या दोन टी-20 मॅचमध्ये अपयशी ठरल्यानंतरही त्याला तिसऱ्या मॅचमध्ये संधी देण्यात आली. रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीममध्ये पुनरागमन झालं, त्यामुळे सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) बाहेर बसावं लागलं. दुसऱ्या टी-20 मधून सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये सूर्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही, तरीही त्याला या सामन्यात संधी मिळाली नाही.

(वाचा : IND vs ENG : 'आता तरी सूर्यकुमारला संधी द्या', फ्लॉप शो नंतर क्रिकेट फॅन्सची मागणी )

विराट कोहली वगळता इतर कोणत्याही भारतीय बॅट्समनना तिसऱ्या टी20 मध्ये  मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. 46 बॉलमध्ये 77 रनवर विराट नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर ऋषभ पंतने 20 बॉलमध्ये 25, हार्दिक पांड्याने 15 बॉलमध्ये 17 रन केले. भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 156 रन केले.

इंग्लंडने हे आव्हान फक्त 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंडकडून जोस बटलरने नाबाद 83 रन केले. या विजयासह इंग्लंडनं या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, Kl rahul, Sports, Virat kohli