अहमदाबाद, 18 मार्च : भारतीय क्रिकेट टीम फिल्डिंग करत असताना कुणाच्या हातातून बॉल सुटला तर त्याच्याकडे रागानं पाहणे ही विराट कोहलीची
(Virat Kohli) सवय आहे. विराटनं यापूर्वी काही चांगल्या कॅच घेतल्या आहेत. तसेच त्याचा फिटनेस हा क्रिकेट विश्वात सर्वोत्तम मानला जातो. दरम्यान फिटनेसमध्ये नंबर 1 असलेल्या विराटची फिल्डिंग ही ढासळली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड
(India vs England) यांच्यातील तिसऱ्या टी20 मॅचमध्ये विराटच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंडविरुद्ध मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात विराटनं जोस बटलर
(Jos Buttler) याच सोपा कॅच सोडला. इंग्लंडच्या इनिंगमधील 15 व्या ओव्हरमध्ये विराटने बटलरला जीवदान दिले. त्याचबरोबर विराट 2019 पासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जास्त कॅच सोडणारा फिल्डर बनला आहे. विराटने या काळात एकूण 6 कॅच सोडले आहेत. त्याच्यासारख्या अव्वल खेळाडूसाठी हा अत्यंत लाजिरवाणा रेकॉर्ड आहे.
विराटनं याबाबतीत इंग्लंडचा फास्ट बॉलर ख्रिस जॉर्डनला मागे टाकले आहे. जॉर्डनने 2019 पासूनच्या आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये 5 कॅच सोडले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2019 सालापासून सर्वात जास्त कॅच सोडणारे फिल्डर
विराट कोहली (भारत) - 6
ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) - 5
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - 4
युजवेंद्र चहल (भारत) - 4
(हे वाचा- IND vs ENG : केएल राहुलच्या जागेवर सूर्यकुमार यादव? वाचा भारताची संभाव्य Playing 11 )
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टी20 मॅच गुरुवारी होणार आहे. . भारतीय टीम इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. आता आणखी एक पराभव झाल्यास भारत ही मालिका गमावेल. त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये चौथी मॅच जिंकावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.