मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'मॅन ऑफ द मॅच', 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारावर विराटची नाराजी

IND vs ENG : 'मॅन ऑफ द मॅच', 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारावर विराटची नाराजी

टीम इंडियानं इंग्लंड (India vs England) विरुद्धच्या टेस्ट आणि टी20 मालिकेनंतर वन-डे मालिका देखील जिंकली. या विजयानंतर एका निर्णयावर विराट कोहलीनं (Virat Kohli) नाराजी व्यक्त केली आहे.

टीम इंडियानं इंग्लंड (India vs England) विरुद्धच्या टेस्ट आणि टी20 मालिकेनंतर वन-डे मालिका देखील जिंकली. या विजयानंतर एका निर्णयावर विराट कोहलीनं (Virat Kohli) नाराजी व्यक्त केली आहे.

टीम इंडियानं इंग्लंड (India vs England) विरुद्धच्या टेस्ट आणि टी20 मालिकेनंतर वन-डे मालिका देखील जिंकली. या विजयानंतर एका निर्णयावर विराट कोहलीनं (Virat Kohli) नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे, 29 मार्च :  टीम इंडियानं इंग्लंड (India vs England) विरुद्धच्या टेस्ट आणि टी20 मालिकेनंतर वन-डे मालिका देखील जिंकली. पुण्यात झालेली शेवटची वन-डे भारतीय टीमनं 7 रननं जिंकली. या विजयानंतर एका निर्णयावर विराट कोहलीनं (Virat Kohli) नाराजी व्यक्त केली आहे. विराटच्या नाराजीचं कारण 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'मॅन ऑफ द सीरिज' हे पुरस्कार होते.

वन-डे सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये सॅम करनला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आले. तर 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारासाठी जॉनी बेअरस्टोची निवड झाली. या पुरस्करांसाठी अनुक्रमे शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड व्हाययला हवी होती, असे मत विराटनं मॅच संपल्यानंतर व्यक्त केले.

वन-डे मालिकेतील विजयानंतर विराटने सांगितले की, ' शार्दुल ठाकूर 'मॅन ऑफ द मॅच' आणि भुवनेश्वर कुमार 'मॅन ऑफ द सीरिज' नाही याचं मला आश्चर्य वाटत आहे. या दोघांनी कठीण परिस्थितीमध्ये जबरदस्त बॉलिंग केली. प्रसिद्ध कृष्णा आण कृणाल पांड्यानेही प्रभावित केले आहे.' शार्दुल ठाकूरने शेवटच्या वन-डे मध्ये 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारनं 10 ओव्हरमध्ये फक्त 42 रन देत 3 विकेट्स घेतल्या.

भुवनेश्वर होता दावेदार

भुवनेश्वर कुमार खऱ्या अर्थाने 'मॅन ऑफ द सीरिजचा' दावेदार होता. तीन्ही वन-डे मध्ये दोन्ही टीमनं प्रत्येक वेळी 300 पेक्षा जास्त रन केले. पुण्याचे पिच बॅटींगला मदत करणारी होती. या पिचवर भुवनेश्वरनं जबरदस्त बॉलिंग केली. त्याने या मालिकेत  29 ओव्हरमध्ये फक्त 135 रन देऊन 6 विकेट्स घेतल्या. भुवनेश्वरचा इकॉनॉमी रेट हा 4.65 इतका होता. तर दुसरिकडं शार्दुल ठाकूरनं सर्वात जास्त 7 विकेट्स घेतल्या. शेवटच्या वन-डे मध्ये तर शार्दुलनं 4 विकेट्स घेतल्या. त्याने निर्णायक  क्षणी मलान, बटलर, लिविंगस्टोन आणि आदिल रशीद यांना आऊट केले.

सॅम करन 'मॅन ऑफ द मॅच'

सॅम करनची तिसऱ्या वन-डे मध्ये 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 8 व्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या या डावखुऱ्या बॅट्समननं 83 बॉलमध्ये 95 रनची खेळी केली. त्याच्या झुंजार खेळीमुळे मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत रंगत कायम होती.

IND vs ENG : कोहलीच्या भन्नाट कॅचने पलटली मॅच, पाहा VIDEO )

जॉनी  बेअरस्टोने या मालिकेत सर्वात जास्त 219 रन केले. त्यामुळे त्याला 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कार देण्यात आला. बेअरस्टोनं 73 च्या सरासरीनं रन केले. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने या मालिकेत एकूण 14 सिक्स लगावले.

First published:

Tags: Cricket, India vs england, Virat kohli