अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी संपूर्णपणे बॉलर्सचं वर्चस्व आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भारताचे सात बॅट्समन फक्त 46 रनची भर देऊन परतले. त्यानंतर इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. अहमदाबादचा स्थानिक खेळाडू अक्षर पटेलनं (Axar Patel) पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरनं पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर झॅक क्रॉलीला आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर जॉनी बेअरस्टोला आऊट केलं. विशेष म्हणजे आधीच्या बॉलवरच इंग्लंडनं यशस्वी Review घेतला होता. त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्येही बेअरस्टो शून्यावर आऊट झाला.
First over of England’s second innings:
W ENG review successfully W 0 1 0 Axar Patel, take a bow #INDvENG ➡️ https://t.co/0unCGUOHmI pic.twitter.com/TO2oytwLDL — ICC (@ICC) February 25, 2021
इंग्लंडच्या खराब सुरुवातीनंतर त्यांचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पिटरसनला चांगलाच धक्का बसला आहे. त्यानं एकाच शब्दात ट्वीट करत आपली अवस्था व्यक्त केली.
Chaos
— Kevin Pietersen (@KP24) February 25, 2021
त्यापूर्वी न बॉलिंगला मदत करणाऱ्या अहमदाबादच्या पिचवर मोठी आघाडी घेण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. भारताची पहिली इनिंग 145 रनवर संपुष्टात आली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 33 रनची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी जो रुट (Joe Root) आणि जॅक लीच (Jack Leach) यांच्या माऱ्यापुढे भारताची इनिंग कोसळली.
(हे वाचा : IPL मध्ये अनसोल्ड राहण्याचा राग ऑस्ट्रेलियावर काढला, हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला! )
इंग्लंडचा कॅप्टन जो रुट हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला त्यानं एकही रन न देता ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला आऊट केलं. त्यापाठोपाठ एक बाजू लावून उभ्या असलेल्या आर. अश्विनची विकेट देखील त्यानं घेतली. जो रुटनं फक्त 8 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला ही टेस्ट गमावून चालणार नाही. तर इंग्लंडला ही टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे या टेस्टमधील उर्वरित दोन इनिंग अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Axar patel, Cricket, India vs england, Team india