मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: इंग्लंडच्या जखमेवर माजी कॅप्टननं चोळलं मीठ, जो रूटच्या टीमला म्हणाला...

IND vs ENG: इंग्लंडच्या जखमेवर माजी कॅप्टननं चोळलं मीठ, जो रूटच्या टीमला म्हणाला...

लॉर्ड्स टेस्ट गमावल्यापासून (India vs England, Lords Test) इंग्लंडच्या टीमवर सातत्यानं टीका होत आहे. इंग्लंडचे माजी कॅप्टन यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्ट गमावल्यापासून (India vs England, Lords Test) इंग्लंडच्या टीमवर सातत्यानं टीका होत आहे. इंग्लंडचे माजी कॅप्टन यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत. मायकल वॉन, डेव्हिड गॉवर यांच्या टीकेनंतर  आता मायकल अथर्टन (Michael Atherton) याने यजमान टीमच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. इंग्लंड टीमची कामगिरी पाहाता ही टीम 0-2 नं मागे हवी होती. नॉटिंघममध्ये पाऊस पडला नसता तर टीम इंडिया सध्या 2-0 नं पुढं असती असा घरचा आहेर अथर्टननं दिला आहे.

मायकल अथर्टननं 'टेलिग्राफ' मधील कॉलमध्ये म्हंटलं आहे की, 'लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी इंग्लंडनं मूर्खासारखा खेळ केला. भारतानं त्या मॅचवर ठसा उमटवला आहे. अवघड परिस्थितिमध्ये टीम इंडियानं जे कौशल्य दाखवले ते पाहाता नॉटिंघम टेस्टचा निकाल काय लागला असता हे स्पष्ट झाले. नॉटिंघममध्ये पाऊस पडला नसता तर भारत या सीरिजमध्ये सध्या 2-0 नं पुढे असता.

पावसामुळे पहिली टेस्ट ड्रॉ

नॉटिंघम टेस्टच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 157 रनची गरज होती, आणि 9 विकेट्स हातामध्ये होत्या. पण त्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे ती टेस्ट ड्रॉ झाली. अर्थात त्यानंतर जो रूटनं पावसाचा अडथळा नसता तर इंग्लंडनं टेस्ट जिंकली असती असा दावा केला होता. टीम इंडियानं लॉर्ड्सवर रूटचा हा गैरसमज दूर करत इंग्लंडचा 151 रननं पराभव केला.

IND vs ENG: टीम इंडियात होणार अश्विनचं पुनरागमन! 'या' खेळाडूची घेणार जागा

इंग्लंड टीममध्ये मोठे बदल

लॉर्ड्स टेस्टमधील पराभवानंतर इंग्लंडच्या टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. झॅक क्रऊले, डॉम सिब्ली आणि जॅक लीच या तिघांना टीममधून वगळण्यात आले आहे. तर डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि फास्ट बॉलर साकिब महमूदचा (Saqib Mahmood) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरु होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england