मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: 3 भारतीय क्रिकेटपटूंचं करिअर 'या' दौऱ्यानंतर होणार समाप्त!

IND vs ENG: 3 भारतीय क्रिकेटपटूंचं करिअर 'या' दौऱ्यानंतर होणार समाप्त!

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील सीरिज सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या सीरिजचा निकाल काय लागेल हे सांगणे सध्या अवघड आहे. पण, टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचं करिअर सध्या धोक्यात आलं आहे.

  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 3 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील सीरिज सध्या रंगतदार अवस्थेत आहे. टीम इंडियानं लॉर्ड्सवर दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर इंग्लंडनं हेडिंग्लेमध्ये झालेली तिसरी टेस्ट जिंकत बरोबरी साधली. ओव्हलवर सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमधील (India vs England 4th Test) पहिल्या दिवसानंतरही मॅचचं पारडं समान आहे. या सीरिजचा निकाल काय लागेल हे सांगणे सध्या अवघड आहे. पण, टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचं करिअर सध्या धोक्यात आलं आहे.

या तिघांमध्ये पहिला क्रमांक चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) आहे. त्यानं या सीरिजमध्ये 7 इनिंगमध्ये 28 च्या सरासरीनं 166 रन काढले असून यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. पण त्याला चार इनिंगमध्ये दोन आकडी रन करण्यातही अपयश आले आहे. यापूर्वी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) पुजारानं 8 आणि 15 रन केले आहेत. पुजारा टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडू आहे. त्यामुळे तो टेस्ट टीममधून बाहेर झाल्यानंतर त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर धोक्यात येणार आहे.

टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. रहाणेनं तीन्ही प्रकारात शतक झळकावलं आहे. पण मागील 19 टेस्टमध्ये त्यानं केवळ 2 अर्धशतक झळकावली आहेत. यापैकी 6 वेळा त्यानं दोन आकडी रन करता आले नाहीत. इंग्लंड विरुद्ध सध्या सुरू असलेल्या सीरिजमध्ये त्यानं 6 इनिंगमध्ये 18 च्या सरासरीनं फक्त 109 रन केले आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

IND vs ENG: टीम इंडियाच्या बॉलर्सचा इंग्लंडमध्ये जलवा, 89 वर्षांमधील BEST कामगिरीची नोंद

टीम इंडियाचा अनुभवी बॉलर इशांत शर्माच्या (Ishant Sharma) करिअरला दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. या कारणामुळे तो क्रिकेटचे तीन्ही फॉर्मेट दीर्घकाळ खेळू शकला नाही.  या सीरिजमध्ये त्याला 2 टेस्ट खेळण्याची संधी मिळाली यामध्ये त्याची कामगिरी फारशी प्रभावी झाली नाही. त्यानं 35 च्या सरासरीनं 5 विकेट्स घेतल्या आहेत.फास्ट बॉलर्समधील तीव्र स्पर्धा लक्षात घेता इशांतची टीममधील जागाही धोक्यात आली आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england