मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : चेन्नईमध्ये टीम इंडियाचाच दबदबा, वाचा काय आहे आकडेवारी

IND vs ENG : चेन्नईमध्ये टीम इंडियाचाच दबदबा, वाचा काय आहे आकडेवारी

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या मालिकेतील पहिली टेस्ट शुक्रवारी चेन्नईत होत आहे. चेन्नईतील मैदानात आजवर नेहमीच भारताचा दबदबा राहिला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या मालिकेतील पहिली टेस्ट शुक्रवारी चेन्नईत होत आहे. चेन्नईतील मैदानात आजवर नेहमीच भारताचा दबदबा राहिला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या मालिकेतील पहिली टेस्ट शुक्रवारी चेन्नईत होत आहे. चेन्नईतील मैदानात आजवर नेहमीच भारताचा दबदबा राहिला आहे.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 4 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या मालिकेतील पहिली टेस्ट शुक्रवारी चेन्नईत होत आहे. या टेस्टच्या निमित्तानं भारतामध्ये तब्बल 11 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु होत आहे. COVID-19 मुळे या काळात क्रिकेट बंद होतं. गेल्या 11 महिन्यात जग मोठ्या प्रमाणात बदललं आहे. क्रिकेटमध्येही अनेक बदल झाले आहेत. या सर्व बदलानंतरही भारताचा क्रिकेट विश्वातील दबदबा कमी झालेला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्ट जिथं होत आहेत, त्या चेन्नईमध्ये तर भारताचं नेहमीच वर्चस्व राहिलं आहे.

या मालिकेपूर्वी भारतानं जबरदस्त खेळ करत ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात 2-1 असा पराभव केला होता. तर श्रीलंकेला 2-0 असं पराभूत करुन इंग्लंडची टीम भारतामध्ये आली आहे. गेल्या 15 वर्षात भारतामध्ये कसोटी मालिका जिंकणारी इंग्लंड ही एकमेव टीम आहे. त्यांनी ही किमया 2012 साली केली होती. जो रुटच्या (Joe Root) टीमचा सध्याचा फॉर्म पाहता ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता आहे.

भारताचा चेन्नईतील रेकॉर्ड

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 1934 साली झाली होती. तेंव्हापासून आजवर दोन्ही देशांमध्ये चेन्नईत एकूण 9 टेस्ट झाल्या आहेत.यापैकी 5 टेस्ट भारतानं जिंकल्या आहेत. तर इंग्लंडनं तीन टेस्ट जिंकल्या असून एक टेस्ट ड्रॉ झाली आहे. इंग्लंडनं यापूर्वी 1985 साली चेन्नईत शेवटची टेस्ट जिंकली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईत यश मिळालेलं नाही. त्याचबरोबर चेन्नईत झालेली मालिकेतील पहिली टेस्ट देखील इंग्लंडनं कधीही जिंकलेली नाही.

मागच्या मालिकेत काय झालं होतं?

यापूर्वी 2016 साली इंग्लंडची टीम भारतामध्ये आली होती. भारतानं ती मालिका 4-0 अशी मोठ्या फरकानं जिंकली होती. त्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची टेस्ट चेन्नईत झाली होती. भारतानं ती टेस्ट एक इनिंग आणि 75 रननं जिंकली होती.

इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 477 रन काढले होते. त्याला उत्तर देताना केएल राहुल 199 आणि करुण नायर 303 या दोघांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर भारतानं 7 आऊट 759 असा विशाल स्कोअर केला होता. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजानं सात विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव 207 वर संपुष्टात आला आणि भारतानं मोठा विजय मिळवला.

First published:

Tags: Chennai, Cricket