मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड दोन्ही टीमला ICC चा झटका, 'ती' चूक पडली महाग

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड दोन्ही टीमला ICC चा झटका, 'ती' चूक पडली महाग

टीम इंडिया आणि इंग्लंड (Team India and England) या दोन्ही टीमला लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी मोठा धक्का बसला आहे. नॉटिंघम टेस्टमधील स्लो ओव्हर रेटमुळे (Slow Over Rate) ICC नं त्यांच्यावर कारवाई केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑगस्ट :  टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही टीमला लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी मोठा धक्का बसला आहे. नॉटिंघममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे दोन टीमच्या मॅच फिसमधील 40 टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. इतकंच नाही तर दोन्ही टीमचे दोन पॉईंट्स कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही टीमकडं सध्या 4 ऐवजी 2 पॉईंट्सच जमा झाले आहेत. नॉटिंघम टेस्टमध्ये पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे ही टेस्ट ड्रॉ झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या पद्धतीनुसार मॅच ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही टीमला प्रत्येकी 4-4 पॉईंट्स देण्यात येणार आहे. मात्र आता भारत आणि इंग्लंडच्या टीमला प्रत्येकी 2-2 पॉईंट्स मिळणार आहेत.

दोन्ही टीमनं निर्धारित वेळेपेक्षा 2-2 ओव्हर्स कमी टाकले होते. त्यामुळे मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉडनं ही कारवाई केली आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बनवण्यात आलेल्या आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल 2.22 नुसार हे प्रकरण कमी ओव्हर रेटशी संबंधित आहे. यामुळे एखाद्या टीमनं निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण केल्या नाहीत तर खेळाडूंवर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येते.  प्रत्येक ओव्हरसाठी मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम कमी करण्याची तरतूद या नियमामध्ये आहे.

त्याचबरोबर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियम 16.11.2 नुसार  प्रत्येक कमी ओव्हर्ससाठी टीमचा एक पॉईंट कमी करण्याची तरतूद आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमनं प्रत्येकी दोन ओव्हर्स कमी टाकल्या होत्या. त्यामुळे त्यांचे दोन-दोन पॉईंट्स कमी करण्यात आले आहेत.

IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीची CSK कॅम्पमध्ये जोरदार एन्ट्री, VIDEO VIRAL

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) या दोघांनीही त्यांची चूक मान्य करत आयसीसीनं दिलेली शिक्षा मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.

First published:

Tags: Cricket news, India vs england