मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : पुण्यातील मैदानातून महेंद्रसिंह धोनीसाठी Good News

IND vs ENG : पुण्यातील मैदानातून महेंद्रसिंह धोनीसाठी Good News

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या वन-डे मध्ये सॅम करनने (Sam Curran) 95 रनची जबरदस्त इनिंग खेळली. आगामी आयपीएलपूर्वी त्याचा हा फॉर्म प्रतिस्पर्धी टीमसाठी धोक्याचा इशारा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या वन-डे मध्ये सॅम करनने (Sam Curran) 95 रनची जबरदस्त इनिंग खेळली. आगामी आयपीएलपूर्वी त्याचा हा फॉर्म प्रतिस्पर्धी टीमसाठी धोक्याचा इशारा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या वन-डे मध्ये सॅम करनने (Sam Curran) 95 रनची जबरदस्त इनिंग खेळली. आगामी आयपीएलपूर्वी त्याचा हा फॉर्म प्रतिस्पर्धी टीमसाठी धोक्याचा इशारा आहे.

पुणे, 29 मार्च :  भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या वन-डे मध्ये सॅम करनने (Sam Curran) 95 रनची जबरदस्त इनिंग खेळली. ती त्याच्या करियरमधील सर्वोत्तम इनिंग होती. या इनिंगनंतरही इंग्लंडला विजय मिळाला नाही. सॅम करनचे प्रयत्न फक्त 7 रन्सनं कमी पडले. करनला रविवारी इंग्लंडला विजय मिळवून देण्यात अपयश आले. मात्र त्याने आगामी आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) विरोधी टीमना इशारा दिला आहे. 22 वर्षांचा सॅम करन आयपीएलमधील महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.

सॅम करन मैदानात उतरला तेव्हा इंग्लंडची अवस्था 6 आऊट 168 अशी होती. भारताने इंग्लंडला विजयासाठी 330 रनचे टार्गेट दिले होते. याचाच अर्थ करन मैदानात उतरला तेव्हा इंग्लंडची टीम विजयापासून 162 रन्स दूर होती आणि त्यांच्या फक्त 4 विकेट्स शिल्लक होत्या. भारत ही मॅच मोठ्या फरकानं जिंकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण सॅम करनच्या मनात काही वेगळाच विचार होता.

सॅम करननं 83 बॉलमध्ये 95 रनची झुंजार इनिंग खेळली. या तरुण खेळाडूनं या खेळीत 9 फोर आणि 3 सिक्स लगावले. त्याने आदिल रशिदसोबत 57 तर मार्क वुडसोबत 60 रनची भागिदारी केली. या झुंजार खेळीसाठी सॅम करनला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आले. भारताने ही मॅच फक्त 7 रनने जिंकली. भारताकडून शार्दुल ठाकूरने 4 तर भुवनेश्वर कुमारने 3 विकेट्स घेतल्या.

सॅम करनचा हा फक्त 8 वा एकदिवसीय सामना होता. यापूर्वी त्याने 5 डावात 37 रन काढले होते. या मॅचपूर्वी त्याचा सर्वोच्च स्कोअर 15 होता. टेस्ट मॅचमध्ये सॅम करननं तीन अर्धशतक झळकावली आहेत.

( वाचा : IND vs ENG : 'मॅन ऑफ द मॅच', 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारावर विराटची नाराजी )

इंग्लंडला शेवटच्या वन-डे मध्ये विजय मिळवता आला नाही. मात्र सॅम करनची ही  खेळी आयपीएल स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी दिलासादायक बातमी आहे. चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं मागील आयपीएलमध्ये करनवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली होती. चेन्नईसाठी मागील आयपीएल स्पर्धा निराशाजनक ठरली असली तरी करननं सर्वांना प्रभावित केले होते. आता या आयपीएलपूर्वी त्याचा फॉर्म हा चेन्नईसाठी खुशखबर आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, IPL 2021