मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: इंग्लंडच्या बॅट्समननं ‘तो’ शॉट खेळला आणि 34 वर्षांपूर्वीची जखम झाली ताजी

IND vs ENG: इंग्लंडच्या बॅट्समननं ‘तो’ शॉट खेळला आणि 34 वर्षांपूर्वीची जखम झाली ताजी

इंग्लंडचा बॅट्समन रॉरी बर्न्सनं (Rory Burns) चेन्नई टेस्ट खेळताना एक चूक केली. या चुकीमुळे इंग्लिश टीमची 34 वर्ष जुनी जखम ताजी झाली आहे.

इंग्लंडचा बॅट्समन रॉरी बर्न्सनं (Rory Burns) चेन्नई टेस्ट खेळताना एक चूक केली. या चुकीमुळे इंग्लिश टीमची 34 वर्ष जुनी जखम ताजी झाली आहे.

इंग्लंडचा बॅट्समन रॉरी बर्न्सनं (Rory Burns) चेन्नई टेस्ट खेळताना एक चूक केली. या चुकीमुळे इंग्लिश टीमची 34 वर्ष जुनी जखम ताजी झाली आहे.

चेन्नई, 05 फेब्रुवारी:  कोरोना व्हायरसच्या (Corona virus) ब्रेकनंतर भारतामध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झालं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट चेन्नईत सुरु झाली आहे. ऐतिहासिक चेपॉक स्टेडियमवर इंग्लडंचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडकडून रोरी बर्न्स (Rory Burns) आणि डॉम सिब्ली (Dom Sibley) या जोडीनं चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 63 रन्सची पार्टरनरशिप केली. या जोडीचा खेळ पाहता पहिल्या सत्रावर इंग्लंडचं वर्चस्व असेल असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र त्याचवेळी रॉरी बर्न्सनं एक चूक केली. या चुकीमुळे तो फक्त आऊट झाला नाही तर 34 वर्ष जुनी एक जखम देखील ताजी झाली आहे.

काय केली चूक?

मैदानात उत्तम जम बसलेल्या बर्न्सनं आर. अश्विनच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्विप खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो फटका आत्मघातकी ठरला. बर्न्सनं मारलेला फटका हवेत उडाला आणि ऋषभ पंतनं बाकी काम केलं. पंतनं त्याचा सोपा कॅच घेतला.

(हे वाचा-IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध या खेळाडूची होईल सर्वाधिक चर्चा, लक्ष्मणचं भाकित)

34 वर्षांपूर्वी काय झालं होतं?

रॉरी बर्न्सचा तो आत्मघातकी फटका पाहताच इंग्लंडच्या फॅन्सची 34 वर्षांपूर्वीची जखम ताजी झाली. 34 वर्षांपूर्वी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये वर्ल्ड कप फायनलची मॅच होती. कोलकातामधील इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या त्या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमची अगदी आरामात वर्ल्ड कप विजेतेपदाकडं वाटचाल सुरु होती.

मॅच हातातून निसटत चालली आहे हे पाहताच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डरनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा प्रमुख बॅट्समन माईक गॅटिंगला (Mike Gatting) बॉर्डरच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्विप खेळण्याचा मोह झाला. बर्न्सप्रमाणेच गॅटींगच्याही बॅटला बॉल नीट लागला नाही. ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर ग्रेग डायरनं तो कॅच सुरुवातीला सोडलाच होता, मात्र त्यानं पुन्हा एकदा प्रयत्न करत तो कॅच कसाबसा पकडला.

(हे वाचा-IND vs ENG : चेन्नई टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराऊंडर टीममधून आऊट)

गॅटींगचा तो आत्मघातकी फटका वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉईंट ठरला. गॅटिंग आऊट होताच ऑस्ट्रेलियानं मॅचवरील पकड घट्ट केली आणि 7 रननं फायनल जिंकली. ऑस्ट्रेलियाचं ते पहिलंच वर्ल्ड कप विजेतेपद होतं. इंग्लंडला वर्ल्ड कप विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी 32 वर्ष वाट पाहावी लागली.

First published:

Tags: Cricket, Rishabh pant