मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्मानं एक निर्णय घेतला आणि विराट कोहली पाहत राहिला!

IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्मानं एक निर्णय घेतला आणि विराट कोहली पाहत राहिला!

गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये यजमान भारतानं इंग्लंडचा 8 रननं पराभव केला. या मॅचमधील शेवटच्या 4 ओव्हरमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मैदानाच्या बाहेर होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) टीमचं नेतृत्त्व केलं.

पुढे वाचा ...

अहमदाबाद, 19 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 टी20 मॅचची मालिका (India vs England T20I Series) सध्या 2-2 ने बरोबरीत आहे. गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये यजमान भारतानं इंग्लंडचा 8 रननं पराभव केला. या मॅचमधील शेवटच्या 4 ओव्हरमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मैदानाच्या बाहेर होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) टीमचं नेतृत्त्व केलं. मैदानातील कॅप्टन रोहित शर्मानं घेतलेल्या एका निर्णयामुळे मॅचचं पारडं बदललं. कॅप्टन विराट कोहली देखील रोहितची शांत कॅप्टनसी मैदानाच्या बाहेरुन पाहत राहिला.

विराट कोहलीचे स्नायू फिल्डिंग करताना दुखावल्यानं तो मैदानाच्या बाहेर गेला. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या 24 बॉलमध्ये 46 रनची आवश्यकता होती. बेन स्टोक्स आणि ऑयन मॉर्गन ही इंग्लंडची अनुभवी जोडी मैदानात होती. त्यामुळे पाहुण्या टीमचं मॅचमधील पारडं जड होते. त्यावेळी रोहितच्या कॅप्टनसीनं मॅचचं चित्र बदललं. रोहितनं 17 वी ओव्हर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) दिली.

शार्दुलला त्यापूर्वी एकही विकेट मिळाली नव्हती. त्याला पहिला बॉल टाकण्यापूर्वी रोहितनं कानमंत्र दिला आणि त्याने लगेच बेन स्टोक्सला आऊट केले. सूर्यकुमार यादवनं त्याचा कॅच घेतला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर शार्दुलनं इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनला ऊट केले.

(हे वाचा-IND vs ENG : भारताच्या वन-डे टीमची घोषणा, चार मुंबईकरांचा टीम इंडियात समावेश)

या दोन विकेटनंतर मॅचचं चित्र बदललं आणि टीम इंडियानं पुनरागमन केलं. रोहितनं त्यानंतर 18 वी ओव्हर हार्दिकला दिली. हार्दिकशी देखील कॅप्टन रोहितनं यावेळी चर्चा केली. त्यानंतर हार्दिकनं त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सॅम करनला आऊट करत रोहितचा निर्णय योग्य ठरवला.

मॅचमधी शेवटची ओव्हर रोहितनं पुन्हा शार्दुलला दिली. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 23 रन हवे होते. जोफ्रा आर्चरनं पहिल्या तीन बॉलवर एक सिक्स आणि एक फोरच्या मदतीनं 11 रन काढले. या नाजूक परिस्थितीमध्ये रोहितनं शार्दुलजवळ धाव घेतली. त्याला धीर दिला. शार्दुलनंही कॅप्टनचा विश्वास खरा ठरवला. त्याने पाचव्या बॉलववर ख्रिस जॉर्डनला आऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

(हे वाचा : IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवरून मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर )

रोहितची ही सर्व कॅप्टनसी मैदानाच्या बाहेरुन विराट पाहत होता. त्याने देखील मॅच जिंकल्यानंतर निश्वास सोडला आणि रोहितशी हस्तांदोलन करत विजयाचा आनंद व्यक्त केला.

First published:

Tags: Cricket, India vs england, Rohit sharma, Shardul Thakur, Virat kohli