मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Eng: रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, आकाश चोप्रानं सांगितलं नेमकी काय आहे समस्या

Ind vs Eng: रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, आकाश चोप्रानं सांगितलं नेमकी काय आहे समस्या

India vs England: विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सामना जिंकण्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चांगल्या खेळीची अपेक्षा भारताला होती. मात्र रोहित शर्मा भारतासाठी चांगली खेळी करू शकला नाही.

India vs England: विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सामना जिंकण्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चांगल्या खेळीची अपेक्षा भारताला होती. मात्र रोहित शर्मा भारतासाठी चांगली खेळी करू शकला नाही.

India vs England: विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सामना जिंकण्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चांगल्या खेळीची अपेक्षा भारताला होती. मात्र रोहित शर्मा भारतासाठी चांगली खेळी करू शकला नाही.

चेन्नई, 08 फेब्रुवारी: चेन्नई सुरू असलेल्या पहिल्या कसोटी (1st Test match) सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 420 धावांचं विशाल लक्ष्य (420 Rus Target) ठेवलं आहे. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सामना जिंकण्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चांगल्या खेळीची अपेक्षा भारताला होती. मात्र रोहित शर्मा भारतासाठी चांगली खेळी करू शकला नाही. पहिल्या डावात फ्लॉप झाल्यानंतर (Out of form) दुसर्‍या डावातही त्याने केवळ 12 धावा केल्या आल्या. दुसर्‍या डावात रोहित शर्माची विकेट डावखुरा फिरकीपटू जॅक लीचने घेतली. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर लीचने रोहित शर्माला बोल्ड केलं. यावर आता आकाश चोप्राने (Akash Chopra) त्याच्या फुट वर्कवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

यावेळी आकाश चोप्राने रोहित शर्माच्या चुकीच्या फटक्याचं विश्लेषण करताना सांगितलं की, रोहित शर्मा बॉलच्या लाइनपर्यंत पोहोचू शकला नाही. जॅक लीचने पहिले दोन चेंडू थोडंसं ऑफ स्टंपच्या बाजूला टाकले. ज्यावर रोहित शर्मा व्यवस्थित खेळू शकला, पण लीचने तिसरा चेंडू लेगसाईडच्या दिशेने टाकला, त्यावर रोहित शर्माने चकमा खाल्ला. चेंडू खडबडीत जागेवर पडल्याने जास्त स्पीन झाला आणि रोहित बोल्ड आऊट झाला. आकाश चोप्राने सांगितलं की, रोहित शर्माने अगदी हलकासा पाय बाहेर काढत चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बॉलच्या लाइनपर्यंत पोहचू शकला नाही. याचं विश्लेषण करताना व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सांगितलं की, रोहित शर्मा एलबीडब्ल्यू टाळण्यासाठी खेळत असल्याचा दिसला.

हे ही वाचा-Ind Vs Eng: विराट कोहलीचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय, 31 डावांत एकही शतक नाही

गेल्या 8 कसोटी सामन्यात रोहित शर्माची खराब कामगिरी

रोहित शर्मा गेल्या 8 कसोटी सामन्यांपासून काही विशेष कामगिरी करू शकला नाही. दरम्यानच्या काळात रोहित शर्माने केवळ 1 अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे रोहितचा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत असून संघ व्यवस्थापक वेगळ्या पर्यायाचा विचार करू शकतात. कारण मयांक अग्रवाल आणि केएल राहुल हे भारतीय क्रिकेट संघात रोहितच्या ठिकाणी सलामीला फलंदाजी करू शकतात.

दुसऱ्या डावात अश्विनचं वादळ

चौथ्या दिवशी दुसऱ्या डावासाठी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 178 धावांवर ऑल आऊट झाला आहे. इंग्लंडच्या संघाला रोखण्यामध्ये आर अश्विनने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडचे 6 गडी बाद केले आहे. यावेळी इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 40 धावा केल्या आहेत. आता टीम इंडियाला चेन्नईत सामना अनिर्णित किंवा जिंकण्यासाठी सर्वोत्तम फलंदाजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे विराट अँड कंपनी हे करू शकते की नाही? हे पाहणं बाकी आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma