मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /गुरूपेक्षा शिष्य सवाई, ऋषभ पंत ठरतोय धोनीपेक्षा BEST मॅचविनर

गुरूपेक्षा शिष्य सवाई, ऋषभ पंत ठरतोय धोनीपेक्षा BEST मॅचविनर

ऋषभ पंतची (Rishabh Pant) आजवर नेहमीच टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) करण्यात येते. टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन आणि आक्रमक विकेटकिपर-बॅट्समन असलेला धोनी हा पंतचा गुरु आहे. सध्याचा त्याचा फॉर्म पाहता पंत त्याच्या गुरुपेक्षाही मोठा मॅच विनर ठरत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 24 ऑगस्ट: टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) 2021 हे वर्ष चांगलंय यशस्वी ठरलं आहे. पंतच्या खेळामुळे टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली होती. त्यानंतर इंग्लंड टीमच्या भारताच्या दौऱ्यातही पंतनं शतक झळकावले होते. या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) पंतनं दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कॅप्टन म्हणून देखील सर्वांना प्रभावित केले. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 होती.

ऋषभ पंतनं त्याच्या आक्रमक खेळामुळे विरोधी टीममध्ये धास्ती निर्माण केली आहे. पंतची आजवर नेहमीच टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) करण्यात येते. टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन आणि आक्रमक विकेटकिपर-बॅट्समन असलेला धोनी हा पंतचा गुरु आहे. सध्याचा त्याचा फॉर्म पाहता पंत त्याच्या गुरुपेक्षाही मोठा मॅच विनर ठरत आहे.

आक्रमक बॅटींगमध्ये ऋषभ पंत हा धोनीपेक्षा पुढं आहे. पंतची एक खास शैली असून त्यामुळे नेहमीच क्रिकेट फॅन्सचा पैसा वसूल होतो. पंत हा आक्रमक बॅट्समन आहे. 4-5 ओव्हर्समध्येच मॅचचं चित्र बदलण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे तो आगामी काळात धोनीसारखाच यशस्वी होऊ शकतो.

ऋषभ पंतकडं मैदानाच्या चारही बाजूमध्ये 360 अंशामध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्यानं जगातील सर्व प्रमुख बॉलर्सची जोरदार धुलाई करताना हे दाखवून दिलं आहे. कितीही मोठ्या फास्ट बॉलरला तो सहज रिव्हर्स स्वीप मारु शकतो. टीम इंडियाला येत्या 3 वर्षात 3 वर्ल्ड कप खेळायचे आहेत. त्या वर्ल्ड कपमध्ये पंतची ही क्षमता टीमसाठी खूप महत्त्वाची आहे. धोनीप्रमाणेच टीम इंडियाला मॅच जिंकून देण्याची त्याची क्षमता आहे.

कोरोनाच्या सावटामध्ये सुरू होणार पॅरालिम्पिक स्पर्धा, भारतीय खेळाडू इतिहास घडवण्यासाठी सज्ज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तीन्ही फॉरमॅट खेळणारा ऋषभ पंत हा सध्या टीम इंडियाचा बेस्ट विकेट किपर आहे. स्टंपच्या मागील देखील त्याचे प्रदर्शन गेल्या काही दिवसांमध्ये सुधारलं आहे. त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेली टेस्ट सीरिज तसंच त्यानंतर होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतची भूमिका भारतासाठी महत्त्वाची असेल.

First published:
top videos

    Tags: Cricket news, MS Dhoni, Rishabh pant