मुंबई, 17 मार्च : भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मंगळवारी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जबरदस्त खेळ केला. विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 मध्ये (India vs England) 156 रनचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. विराटची ही खेळी टीम इंडियाला पराभवापासून वाचवू शकली नाही. जोस बटलरच्या (Jos Buttler) आक्रमक खेळामुळे इंग्लंडने भारताचा आठ विकेटने पराभव केला. भारताच्या या पराभवानंतर अनेकांच्या मनावर विराटच्या बॅटींगने मोहिनी घातली आहे.
बॉलिवूडचा 'सिंबा' म्हणजेच आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने विराट कोहलीची जोरदार प्रशंसा केली आहे. रणवीरने विराटच्या खेळीचे कौतुक करणारे दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये रणवीरने म्हटलं आहे, 'मी सर्वात चांगली टी20 बॅटींग पाहिली. मैदानाच्या चारही बाजूने जोरदार शॉट्स. हा माणूस एक मशीन आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहलं आहे 'चिकू ऑन फायर'
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये कोहलीने नाबाद 77 रन केले, याचसोबत तो कर्णधार म्हणून सर्वाधिक 11 वेळा 50 पेक्षा जास्त स्कोअर करणारा खेळाडू ठरला आहे. कोहलीने मंगळवारी झालेल्या मॅचपूर्वी 10 वेळा कर्णधार असताना 50 पेक्षा जास्त स्कोअर केला होता. यातल्या 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर 3 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. विराट कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार रन करणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.
( या गोड अभिनेत्रीनं जसप्रितच्या लग्नावेळीच गायलं सॅड सॉंग, व्हायरल VIDEO वर रंगताहेत चर्चा )
मागच्या मॅचमध्येही विराटने नाबाद 73 रन केले होते, ज्यामुळे भारताचा विजय झाला होता. या मॅचमध्येही विराट आऊट झाला नाही. टी-20 करियरमध्ये विराटने 3078 रन केले, यात त्याने 27 वेळा 50 पेक्षा जास्त स्कोअर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Cricket, India vs england, Ranveer singh, Sports, Virat kohli