• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs ENG : टीम इंडियात दाखल झाले 2 नवे खेळाडू, 'खास' कारणामुळे झालं आगमन

IND vs ENG : टीम इंडियात दाखल झाले 2 नवे खेळाडू, 'खास' कारणामुळे झालं आगमन

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स टेस्ट (India vs England 2nd Test) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दोन ताज्या दमाचे खेळाडू टीम इंडियात दाखल झाले आहेत.

  • Share this:
    लॉर्ड्स, 15 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स टेस्ट (India vs England 2nd Test) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 27 रनची आघाडी घेतली आहे. आता या टेस्टचा चौथा दिवस महत्त्वाचा असून ही टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाला या दिवशी जबाबदारीनं बॅटींग करावी लागणार आहे. लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हे दोघं टीम इंडियामध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून त्यानंतर ते दोघं टीम इंडियात दाखल झालेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) त्यांचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये ते दोघंही लॉर्ड्स स्टेडियममध्ये बसलेले दिसत आहेत. इंग्लंड दौऱ्यातील तीन खेळाडू जखमी झाल्यानंतर या दोघांना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आलं आहे. इंग्लंड दौऱ्यावरील शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन खेळाडू जखमी झाल्यानं इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमधून बाहेर झाले आहेत. त्यानंतर या खेळाडूंची मागणी टीम मॅनेजमेंटनं केली होती. सूर्यकुमार आणि पृथ्वीने श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. शॉने 3 सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने 105 रन केले, तर सूर्यकुमार यादवनेही इतक्याच सामन्यांमध्ये 62 च्या सरासरीने 124 रन बनवले. सूर्यकुमार यादवने अजून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं नाही. याचवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधली त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. 77 सामन्यांमध्ये 44 पेक्षा जास्तच्या सरासरीने त्याने 5,326 रन केले, यात 14 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे शॉने 5 टेस्टमध्ये 42 च्या सरासरीने 339 रन केले. शॉने पदार्पणाच्या आपल्या टेस्टमध्येच शतक केलं होतं. विराट कोहलीनं सुधारली चूक, मोहम्मद सिराजच्या मागणीवर घेतला 'हा' निर्णय मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एडलेड टेस्टमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर शॉला टीमबाहेर करण्यात आलं, पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने धमाकेदार कामगिरी केली. 8 सामन्यांमध्ये 165 च्या सरासरीने त्याने 827 रन ठोकले, यामध्ये 4 शतकं होती.
    Published by:News18 Desk
    First published: