मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: तुला मानला रे ठाकूर! इंग्लंडमध्ये केला सर्वात मोठा रेकॉर्ड

IND vs ENG: तुला मानला रे ठाकूर! इंग्लंडमध्ये केला सर्वात मोठा रेकॉर्ड

टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) केले. शार्दुलनं फक्त 36 बॉलमध्ये 57 रन केले.

टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) केले. शार्दुलनं फक्त 36 बॉलमध्ये 57 रन केले.

टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) केले. शार्दुलनं फक्त 36 बॉलमध्ये 57 रन केले.

  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 3 सप्टेंबर: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधील चौथी टेस्ट ओव्हलवर होत आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं टॉस जिंकून भारताला बॅटींगचं आमंत्रण दिलं. पण, लीड्स प्रमाणे इथंही भारतीय बॅट्समननी स्वींग बॉलिंगसमोर निराशा केली आहे. विराट कोहलीची (Virat Kohli) टीम 61.3 ओव्हरमध्ये 191 रनवरच ऑल आऊट झाली. विराटनं 50 रनची खेळी केली. पण, सर्वात जास्त रन दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) केले. शार्दुलनं फक्त 36 बॉलमध्ये 57 रन केले.

शार्दुलनं या खेळीत 7 फोर 3 सिक्स लगावले. रॉबिनसनच्या बॉलिंगवर सिक्स लगावत त्यानं अर्धशतक केलं. त्यानं फक्त 31 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. हे इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. शार्दुलच्यापूर्वी हा रेकॉर्ड इयान बोथमच्या नावावर होता. त्यानं 1986 साली न्यूझीलंड विरुद्ध 32 बॉलमध्ये अर्धशतक केले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही अर्धशतक ओव्हलच्या मैदानावरच आले आहेत.

भारतीय बॅट्समननं टेस्ट क्रिकेटमध्ये झळकावलेलं हे दुसरं वेगवान अर्धशतक आहे. हा रेकॉर्ड कपिल देवच्या (Kapil Dev) नावावर आहे. कपिल देवनं 1982 साली पाकिस्तान विरुद्ध 30 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्याशिवाय वीरेंद्र सेहवागनं 2008 साली इंग्लंड विरुद्ध 33 बॉलमध्ये अर्धशतक केले होते.

IND vs ENG : 'हे तर इच्छा मरण', दोन खेळाडू टीममध्ये नसल्याने थरूर विराटवर भडकले

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने या सामन्यासाठी टीममध्ये दोन बदल केले आहेत. जॉस बटलरऐवजी (Joss Buttler) ओली पोपचा (Ollie Pope) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे, तर सॅम करनऐवजी (Sam Curran) क्रिस वोक्सला (Chris Woakes) संधी देण्यात आली आहे. तर भारतानेही या सामन्यात दोन बदल केले आहेत. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं आहे. या दोघांच्याऐवजी शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांना संधी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england