मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'हे' पाच जण ठरले भारताच्या वन-डे मालिका विजयाचे हिरो

IND vs ENG : 'हे' पाच जण ठरले भारताच्या वन-डे मालिका विजयाचे हिरो

भारतीय टीमनं इंग्लंडला टेस्ट आणि टी 20 नंतर वन-डे मालिकेतील देखील पराभूत केले. भारताच्या या मालिका विजयात पाच खेळाडूंचे योगदान मोलाचे होते.

भारतीय टीमनं इंग्लंडला टेस्ट आणि टी 20 नंतर वन-डे मालिकेतील देखील पराभूत केले. भारताच्या या मालिका विजयात पाच खेळाडूंचे योगदान मोलाचे होते.

भारतीय टीमनं इंग्लंडला टेस्ट आणि टी 20 नंतर वन-डे मालिकेतील देखील पराभूत केले. भारताच्या या मालिका विजयात पाच खेळाडूंचे योगदान मोलाचे होते.

पुणे, 29 मार्च : भारतीय टीमनं इंग्लंडला टेस्ट आणि टी 20 नंतर वन-डे मालिकेतील देखील पराभूत केले. टीम इंडियाने (Team India) 4 टेस्टची मालिका 3-1 ने जिंकली. त्यानंतर टी 20 मालिकेत 3-2 असा विजय मिळवला. त्यापाठोपाठ वन-डे मालिकेत देखील 2-1 या फरकाने इंग्लंडला नमवले. भारताच्या या मालिका विजयात पाच खेळाडूंचे योगदान मोलाचे होते.

केएल राहुल

भारताचा स्टार बॅट्समन केएल राहुल (KL Rahul) टी20 मालिकेत फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. राहुलनं वन-डे मालिकेत पुनरागमन केलं. त्यानं या मालिकेत भारताकडून सर्वात जास्त रन काढले.  राहुलनं 3 मॅचमध्ये 177 रन्स काढले. ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 101.14 तर सरासरी 88.50 इतकी होती.

ऋषभ पंत

भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) चा फॉर्म वन-डे मालिकेतही कायम होता. त्याने दोन मॅचमध्ये 155 रन्स काढले. त्याने या दोन्ही मॅचमध्ये अर्धशतक झळकावले. पंतने वन-डे करिअरमधील सर्वोच्च स्कोअर (78 रन) याच मालिकेत बनवला. या मालिकेत भारताकडून सर्वात जास्त रन बनवणाऱ्या बॅट्समनच्या यादीत पंत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचा स्ट्राईक रेट 151.96 इतका जबरदस्त होता.

शिखर धवन

टीम इंडियाचा सलामीवीर असलेल्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) या मालिकेत चांगला खेळ केला. त्याने 3 मॅचमध्ये 2 अर्धशतकांसह 169 रन काढले. त्याची सरासरी 56.33 होती. तर स्ट्राईक रेट 94.41 होता. तो या मालिकेत सर्वात जास्त रन करणारा तिसरा बॅट्समन ठरला.

शार्दुल ठाकूर

मुंबईचा फास्ट बॉलर असलेल्या शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) साठी देखील ही मालिका चांगली गेली. त्याने तिसऱ्या आणि निर्णायक वन-डे मध्ये सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं. शार्दुलने बॅटींग करताना रॉस टॉपले, मार्क वुड आणि बेन स्टोक्स सारख्या  गोलंदाजांच्या बॉलिंगवर सिक्स लगावले. त्याचबरोबर नंतर 4 विकेट्स घेतल्या. या मालिकेत सर्वात जास्त 7 विकेट्स शार्दुलच्याच नावावर आहेत.

( वाचा : IND vs ENG : पहिले 491 दिवस ते दुसरे 491 दिवस, विराटला नेमकं झालंय काय? )

भुवनेश्वर कुमार

भारताचा अनुभवी बॉलर भुवनेश्वर कुमार  (Bhuvneshwar Kumar) दुखापतीनंतर या मालिकेत पुनरागमन करत होता. त्याने टी-20 पाठोपाठ वन-डे मालिकेतही टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. टीमला गरज असताना विकेट घेण्याचं काम भुवनेश्वरनं केलं. त्याचा वन-डे मालिकेतील इकॉनॉमी रेट हा सर्वात चांगला म्हणजेच 4.65 इतका होता. त्याचबरोबर भुवनेश्वरनं 3 मॅचमध्ये 6 विकेट्स देखील घेतल्या.

First published:

Tags: Cricket, India vs england