Home /News /sport /

IND vs ENG: .... आणि म्हणून मोहम्मद कैफनं केला नागीण डान्स, VIDEO VIRAL

IND vs ENG: .... आणि म्हणून मोहम्मद कैफनं केला नागीण डान्स, VIDEO VIRAL

भारतीय क्रिकेट टीममधील माजी बॅट्समन मोहम्मद कैफचा (Mohammad Kaif) नागीण डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट टीममधील माजी बॅट्समन मोहम्मद कैफचा (Mohammad Kaif)  नागीण डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. कैफनंच याचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याला फॅन्सनची चांगलीच पसंती मिळत आहे. टीम इंडियानं ओव्हल टेस्ट जिंकल्याबद्दल कैफनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. कैफची वचनपूर्ती भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील ओव्हल टेस्टच्या दरम्यान मोहम्मद कैफ  हा  वीरेंद्र सेहवागसोबत (Virender Sehwag) कॉमेंट्री करत होता. त्यावेळी श्रीलंका दौऱ्याच्यापूर्वी कैफनं दिलेल्या आश्वासानची आठवण त्याला एका प्रेक्षकानं केली. इंग्लंडमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला तर नागीण डान्स करण्याचं वचन कैफनं दिलं होतं. 2 दिवसांमध्ये 6 मोठे वाद, T20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप या कॉमेंट्रीच्या दरम्यान सेहवागनं तू तुझं वचन पूर्ण कर असं कैफला म्हंटलं होतं. त्यावर टीम इंडियानं ओव्हल टेस्ट जिंकली तर नागिण डान्स करु असं सांगितलं. भारतानं ओव्हल टेस्टमध्ये पाचव्या दिवशी इंग्लंडला 157 रननं पराभूत करत पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 2-1 नं आघाडी घेतली आहे. आता पाचवी आणि शेवटची टेस्ट 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या