मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : इंग्लंडचा माजी कॅप्टनही झाला ऋषभ पंतचा फॅन, म्हणाला...

IND vs ENG : इंग्लंडचा माजी कॅप्टनही झाला ऋषभ पंतचा फॅन, म्हणाला...

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन  (Michael Vaughan) देखील भारताचा विकेटकिपर - बॅट्समन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॅन झाला आहे.

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) देखील भारताचा विकेटकिपर - बॅट्समन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॅन झाला आहे.

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) देखील भारताचा विकेटकिपर - बॅट्समन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॅन झाला आहे.

मुंबई, 29 मार्च : इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन  (Michael Vaughan) देखील भारताचा विकेटकिपर - बॅट्समन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) फॅन झाला आहे. पंतच्या निर्भिड बॅटींमुळे वॉन चांगलाच प्रभावित झाला आहे. पंत बॅटींगला येतो तेव्हा त्याच्यावर कसलाही दबाव नसतो, असे मत वॉनने व्यक्त केले आहे. वॉन म्हणाला की, 'पंत निर्भिडपणे बॅटींग करतो. तो जणू काही बागेत खेळतोय या पद्धतीनं खेळत असतो. अंडर-११ , अंडर -१५, अंडर-१९ किंवा भारताकडून खेळत असला तरी पंतवर त्याचा काही परिणाम होत नाही. त्याच्यासाठी हा फक्त खेळ आहे. खेळाबद्दलचा त्याचा  विचार हा एकदम नवा आहे. या प्रकारचा विचार आणि मानसिकता ही अत्यंत अवघड आहे.'

'पंतची कॉपी करु नका'

इंग्लंडच्या माजी कॅप्टननं 'क्रिकबझ' शी बोलताना पुढे सांगितले की, 'पंतचा खेळ पाहणाऱ्या युवा खेळाडूंनी त्याच्या तंत्राची कॉपी करु नये असा माझा सल्ला आहे. त्याचे तंत्र खास आहे. मागील काही महिन्यात आक्रमक बॅट्समनच्या रुपात पंतची ओळख आणखी ठळक झाली आहे. अनेकदा आक्रमक खेळाच्या नादात विकेट फेकतो अशी त्याच्यावर टीका केली जाते. मात्र, मागील काही महिन्यात त्याच्या खेळात मोठी सुधारणा झाली आहे. आता तो मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतो,' असे वॉनने स्पष्ट केले.

ऋषभ पंतनं इंग्लंड विरुद्धच्या वन-डे मालिकेतही चांगला खेळ केला. त्याला शतक झळकावता आले नाही. मात्र त्याने तिसऱ्या वन-डे मध्ये हार्दिक पांड्यासोबत आक्रमक पार्टरनरशिप केली. पंतने 62 बॉलमध्ये 78 रन काढले. हा त्याचा वन-डे करियरमधील सर्वोच्च स्कोअर आहे.  यामध्ये पाच फोर आणि चार सिक्सचा समावेश होता. त्याच्या खेळामुळेच भारताला 300 रनचा टप्पा ओलांडता आला.

( वाचा : IND vs ENG : 'हे' पाच जण ठरले भारताच्या वन-डे मालिका विजयाचे हिरो )

इंझमामने केले कौतुक

पाकिस्तान टीमचा माजी कर्णधार इंजमाम उल हकही (Inzamam Ul Haq) याने देखील ऋषभ पंतचे कौतुक केले आहे. 'ऋषभ पंत ज्या पद्धतीने खेळतो, जसे शॉट मारतो. मागच्या 30-35 वर्षात फक्त धोनी आणि एडम गिलख्रिस्ट यांनीच अशी कामगिरी केली आहे. हे दोन विकेट कीपर स्वत:च्या जीवावर मॅच जिंकवून द्यायचे. ऋषभ पंतही तशीच कामगिरी करत आहे. जर तो अशाच पद्धतीने खेळला तर लवकरच तो धोनी आणि गिलख्रिस्टला मागे टाकेल,' अशी प्रतिक्रिया इंजमामने दिली आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, Rishabh pant