मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : केएल राहुलनं सेहवागच्या दुप्पट वेगानं केली कमाल, वाचा ऐतिहासिक शतकाच्या 5 मोठ्या गोष्टी

IND vs ENG : केएल राहुलनं सेहवागच्या दुप्पट वेगानं केली कमाल, वाचा ऐतिहासिक शतकाच्या 5 मोठ्या गोष्टी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टचा (India vs England 2nd Test) पहिला दिवशी केएल राहुलनं (KL Rahul) शतक झळकावलं आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस तो 127 रनवर नाबाद आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टचा (India vs England 2nd Test) पहिला दिवशी केएल राहुलनं (KL Rahul) शतक झळकावलं आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस तो 127 रनवर नाबाद आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टचा (India vs England 2nd Test) पहिला दिवशी केएल राहुलनं (KL Rahul) शतक झळकावलं आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस तो 127 रनवर नाबाद आहे.

लॉर्ड्स, 13 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टचा (India vs England 2nd Test) पहिला दिवस भारतीय बॅट्समनननं गाजवला. रोहित शर्मानं (Rohit Sharma) 83 रनची खेळी करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. तर केएल राहुलनं (KL Rahul) शतक झळकावले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस तो 127 रन काढून नाबाद आहे.

राहुलनं नॉटिंघम टेस्टमध्ये 84 रनची खेळी केली होती. त्यानं तोच फॉर्म कायम ठेवत लॉर्ड्सवर शतक झळकावलं. राहुलचं टेस्ट क्रिकेटमधील हे सहावं शतक असून लॉर्ड्स टेस्टमध्ये शतक झळकावणारा रा्हुल दहावा भारतीय बॅट्समन बनला आहे. राहुलच्या या शतकातील पाच मोठ्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया

  1. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शतक झळकावणारा राहुल हा तिसरा भारतीय ओपनर आहे. यापूर्वी विनू मंकड यांनी 1952 साली तर रवी शास्त्री यांनी 1990 साली शतक झळकावले होते.
  2. केएल राहुलनं आशिया खंडाच्या बाहेर शतक झळकावण्यात वीरेंद्र सेहवागची (Virendra Sehwag) बरोबरी केली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुलनं सेहवागच्या दुप्पट वेगानं ही कमाल केली आहे. सेहवागनं आशिया खंडाच्या बाहेर 59 इनिंगमध्ये 4 शतक झळकावले होते. तर राहुलनं 28 इनिंगमध्येच ही कमाल केली आहे. आशिया खंडाच्या बाहेर सर्वात जास्त शतक झळकावण्याचा विक्रम सुनील गावसकरांच्या नावावर आहे. त्यांनी 15 शतक झळकावली आहेत.
  3. गेल्या सहा वर्षात आशिया खंडाच्या बाहेर सर्वाधिक शतक झळकावणारा भारतीय बॅट्समन केएल राहुल आहे.
  4. केएल राहुलनं इंग्लंडविरुद्ध नेहमीच चांगला खेळ केला आहे. राहुलनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये एकूण 13 शतक झळकावले आहेत. यामध्ये 4 शतक त्यानं इंग्लंडमध्ये लगावली आहेत. भारतामध्ये 3 तर श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये त्याने प्रत्येकी 1 शतक झळकावलं आहे.IND VS ENG: चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फ्लॉप, विराटला घ्यावा लागणार कठोर निर्णय
  5. लॉर्ड्स आणि ओव्हल या इंग्लंडमधील दोन्ही मैदानात शतक झळकावणारा राहुल हा तिसरा भारतीय बनला आहे.यापूर्वी ही कामगिरी रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांनी केली आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england