मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'ती माझी....' KL राहुलनं BCCI ला सांगितलं आथिया शेट्टीसोबतचं नातं

'ती माझी....' KL राहुलनं BCCI ला सांगितलं आथिया शेट्टीसोबतचं नातं

टीम इंडियाचा क्रिकेटपटू के.एल. राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty ) हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. राहुलनं स्वत: या नात्याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 जुलै: टीम इंडियाचा क्रिकेटपटू के.एल. राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. या दोघांना यापूर्वी अनेकदा एकत्र पाहिलेलं आहे. तसेच ते सोशल मीडियावर देखील एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या नात्याबद्दल सर्वत्र चर्चा असली तरी अद्याप राहुल किंवा आथिया या दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे याबद्दल काही खुलासा केला नव्हता. मात्र आता या रिलेशनशिपबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. आथिया शेट्टी ही आपली पार्टनर असल्याची माहिती केएल राहुलनं बीसीसीआयला दिली आहे, असं वृत्त 'हिंदुस्थान टाईम्सनं' दिलं आहे. राहुल सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर बीसीसीआयनं खेळाडूंना कुटुंबीयांसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. भारतीय टीममधील बहुतेक खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांसोबत इंग्लंड दौऱ्यावर बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो-बबलमध्ये राहत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final) इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंकडे त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मागितली होती. त्यावेळी राहुलनं आथिया आपली पार्टनर असल्याची माहिती बीसीसीआयला कळवले असल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे.
कुलदीप-चहलची धमाल, टीम इंडियाच्या दिग्गजांची केली नक्कल! पाहा VIDEO आथियाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती बेडवर बसलेली आहे. तो बेड हॉटेलमधील एका रूमचा वाटत असून आथियानं निळ्या आणि फिकट तपकिरी रंगाचे जॅकेट घातले आहे. हा फोटो पाहून आथिया इंग्लंडमध्ये आहे अशी प्रतिक्रिया फॅन्सनी दिली होती. तसेच आथिया शेट्टीचा भाऊ अहानसोबत लंडनमध्ये फिरत असलेला फोटो देखील राहुलनं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
First published:

Tags: BCCI, Kl rahul

पुढील बातम्या