IND vs ENG : इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवाचं पीटरसननं शोधलं कारण!
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसरी टेस्ट टीम इंडियानं 317 रननं जिंकली. इंग्लंडचा हा दणदणीत पराभव त्यांचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनच्या (Kevin Pietersen) चांगलाच जिव्हारी लागला आहे.
चेन्नई, 16 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसरी टेस्ट टीम इंडियानं 317 रननं जिंकली. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडनं भारताचा 227 रननं पराभव केला. या पराभवानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. भारतानं सांघिक प्रयत्नामुळे ही टेस्ट साडे तीन दिवसांमध्येच जिंकली. इंग्लंडला दोन्ही इनिंगमध्ये 200 चा टप्पा ओलांडता आला नाही.
That winning feeling!
Smiles all round as #TeamIndia beat England in the second @Paytm#INDvENG Test at Chepauk to level the series 1-1.
इंग्लंडचा हा दणदणीत पराभव त्यांचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनच्या (Kevin Pietersen) चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर आपल्या टीमला खेळ सुधारण्याचा सल्ला देण्याच्या ऐवजी त्यानं भारतीय टीमलाच टोला लगावला आहे.
पीटरसननं दुसरी टेस्ट संपल्यानंतर लगेच खास हिंदी भाषेत ट्वीट करत त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये इंग्लंडच्या B टीमचा पराभव केल्याबद्दल भारतीय टीमचं अभिनंदन, असं ट्वीट पीटरसननं केलं आहे. त्याचं हे ट्वीट आता चांगलंच व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
या ट्वीटनंतर काही वेळानं पीटरसननं आणखी एक ट्वीट करत टीम निवडीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
You don’t pick your best team in the hardest place to WIN a Test match, you actually cannot even show emotion to it.
भारताविरुद्ध ही टेस्ट हरलेल्या इंग्लंडच्या टीममध्ये अनेक प्रमुख खेळाडू नाहीत. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे ही टेस्ट खेळू शकला नाही. जेम्स अँडरसनला टीम मॅनेजमेंटनं विश्रांती दिली आहे. जोस बटलरही पहिल्या टेस्टनंतर विश्रांती घेण्यासाठी मायदेशी परतला आहे. तर जॉनी बेअरस्टो देखील सध्या विश्रांती घेत असून तो भारतामध्ये आलेलाच नाही. चार प्रमुख खेळाडूंच्या विना खेळणारी ही इंग्लंडची B टीम असल्याचं पीटरसननं म्हंटलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भरगज्ज वेळापत्रकामुळे प्रमुख खेळाडूंच्या दुखापती हा सर्वच टीमसाठी डोकेदुखीचा विषय आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. शेवटच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचे सर्व प्रमुख बॉलर्स दुखापतीमुळे आऊट होते. तरीही भारतानं ही ब्रिस्बेन टेस्ट आणि मालिका जिंकली.
भारत- इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्टमध्येही मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहेत. तर पुढील टेस्टसाठी फ्रेश राहण्यासाठी भारतानं या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली होती.
भारताला जमलं, इंग्लंडला नाही!
भारताला जे जमलं, ते इंग्लंडला जमलं नाही. इंग्लंडची टीम भारतापेक्षा खराब खेळली. त्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. पीटरसननं ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला आता खरी परीक्षा असल्याचा इशारा दिला होता. पहिल्या टेस्टनंतरही त्यानं त्याच्या जुन्या ट्वीटची आठवण सर्वांना करुन दिली होती. आता दुसऱ्या टेस्टमधील पराभवानंतर त्याची भाषा संपूर्णपणे बदलली आहे.