मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: भारत दौऱ्यासाठी इंग्लंड टीम जाहीर, दोन बड्या खेळाडूंचं कमबॅक!

IND vs ENG: भारत दौऱ्यासाठी इंग्लंड टीम जाहीर, दोन बड्या खेळाडूंचं कमबॅक!

भारताविरुद्ध होणाऱ्या चार टेस्टपैकी पहिल्या दोन टेस्टसाठी इंग्लंडनं (England) 16 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. या मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत (Chennai) होणार आहे.

भारताविरुद्ध होणाऱ्या चार टेस्टपैकी पहिल्या दोन टेस्टसाठी इंग्लंडनं (England) 16 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. या मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत (Chennai) होणार आहे.

भारताविरुद्ध होणाऱ्या चार टेस्टपैकी पहिल्या दोन टेस्टसाठी इंग्लंडनं (England) 16 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. या मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत (Chennai) होणार आहे.

मुंबई, 22 जानेवारी : भारताविरुद्ध होणाऱ्या चार टेस्टपैकी पहिल्या दोन टेस्टसाठी इंग्लंडनं (England) 16 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या टीममधील तीन जणांना आराम देण्यात आला असून दोन बड्या खेळडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोण इन, कोण आऊट?

आयसीसी वर्ल्ड कप 2019 (ICC World Cup 2019) फायनलमध्ये चांगली कामगिरी करणारा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि सुपर ओव्हर टाकणारा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) या दोघांचा टीममध्ये पुन्हा समावेश झाला आहे. श्रीलंका दौऱ्यात त्यांना विश्रांती देण्यात आली होती.

सध्या श्रीलंकेत असलेल्या इंग्लंड टीममधील जॉनी बेअरस्टो, मार्क वुड आणि सॅम करन या तिघांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर रोरी बर्न्स यांचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

(हे वाचा-सिराजचा खुलासा, सिडनी टेस्टमध्ये वर्णभेदी शेरेबाजीवर अंपायरने त्याला हे सांगितलं)

बटलर लवकर परतणार

इंग्लंडचा विकेट किपर बॅट्समन जोस बटलर (Jos Buttler) पहिल्या टेस्टनंतर घरी परतणार आहे. त्याच्या जागी बेन फोक्स (Ben Foakes) खेळेल.

पहिली टेस्ट कधी?

इंग्लंडची टीम सध्या श्रीलंकेत दोन टेस्टची सीरिज खेळत आहे. जो रुटच्या (Joe Root) द्विशतकाच्या जोरावर त्यांनी पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा सात विकेट्सनं पराभव केला होता. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत होईल. या मालिकेतील पहिल्या दोन टेस्ट चेन्नईमध्ये होणार आहेत.

(हे वाचा-ऑस्ट्रेलियाचा विजयी वीर नटराजनच्या स्वागताला बग्गी; सेहवागने शेअर केला VIDEO)

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारी टेस्ट मॅच डे-नाईट असेल. तर या मैदानावर 4 मार्चपासून या मालिकेतील शेवटची टेस्ट खेळली जाईल. त्यानंतर 12 मार्चपासून 5 मॅचची T20 मालिका सुरु होईल. 23 मार्चपासून 3 वन-डे मॅचची मालिका सुरु होणार आहे.

पहिल्या दोन टेस्टसाठी इंग्लंडची टीम

जो रुट (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, जॅक क्राऊली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन आणि ख्रिस वोक्स

पहिल्या दोन टेस्टसाठीची भारतीय टीम

विराट कोहली (कॅप्टन),  शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, ऋद्धीमान साहा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, आर.अश्विन, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल.

First published:
top videos

    Tags: Cricket