चेन्नई, 5 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टला चेन्नईमध्ये सुरुवात झाली आहे. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहसाठी (Jaspreet Bumrah) ही टेस्ट खास आहे. तब्बल 17 टेस्टनंतर बुमराह भारतामध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळत आहे. बुमराहनं जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण भारतामध्ये पहिली टेस्ट खेळण्यासाठी त्याला तब्बल तीन वर्ष वाट पाहावी लागली आहे.
बुमराहचा विक्रम हुकला
जसप्रीत बुमराहचं भारतामधील पहिली टेस्ट ही आणखी संस्मरणीय ठरली असती. पण, विकेट किपर ऋषभ पंतनं (Rishabh Pant) त्याच्या पहिल्याच बॉलवर कॅच सोडला. बुमराहनं टाकलेला बॉल इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सच्या (Rory Burns) बॅटला लागून पंतच्या दिशेनं गेला. पण पंतला तो अवघड कॅच टिपता आला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पंतनं खराब विकेट किपिंग केली होती.
Jasprit Bumrah's first ball in a home Test, and Rishabh Pant puts down a low chance down the leg side https://t.co/1D5Zr2qesX #INDvENG pic.twitter.com/sJnfaPjx8C
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 5, 2021
यापूर्वी इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. रोरी बर्न्स आणि डॉम सिब्ली या जोडीनं संयमी सुरुवात केली आहे. इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी जोडीला त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं पहिल्या दहा ओव्हरमध्येच आर. अश्विनच्या (R. Ashwin) हाती बॉल सोपवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये आर. अश्विनसह, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम हे तीन स्पिनर्स खेळवले आहेत.
(हे वाचा-IND vs ENG : चेन्नई टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराऊंडर टीममधून आऊट)
टीम इंडियामध्ये पाच बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ब्रिस्बेन टेस्ट गाजवणाऱ्या मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा या दोन अनुभवी बॉलर्सची अंतिम 11 मध्ये निवड झाली आहे. आर. अश्विन आणि शाहबाज नदीम यांचा अनुक्रमे टी. नटराजन आणि नवदीप सैनीच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अश्विन दुखापतीमुळे ब्रिस्बेन टेस्ट खेळू शकला नव्हता. तर अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यानं शाहबाज नदीमला अगदी ऐनवेळी टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तसंच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली परत आल्यानं मयांक अग्रवालला वगळण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rishabh pant