IND vs ENG : इशानच्या पहिल्या मॅचपूर्वी गर्लफ्रेंडनं चेहऱ्याला लावलं रक्त! वाचा, काय आहे कारण

IND vs ENG : इशानच्या पहिल्या मॅचपूर्वी गर्लफ्रेंडनं चेहऱ्याला लावलं रक्त! वाचा, काय आहे कारण

इशान किशनच्या शानदार कामगिरीनंतर त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया (Aditi Hundia) चांगलीच चर्चेत आहे. आदितीनं इशानच्या पहिल्या मॅचपूर्वीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या टी-20 मध्ये इशान किशन (Ishan Kishan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागेवर टीममध्ये समावेश झालेल्या इशान किशनने फक्त 32 बॉलमध्ये पाच फोर आणि चार सिक्सच्या मदतीने 56 रन काढले. त्याने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 94 रनची भागिदारी  केली. ही भागिदारी भारताच्या विजयामध्ये निर्णयाक ठरली. पदार्पणातील जबरदस्त खेळाबद्दल इशानला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

इशानच्या या शानदार कामगिरीनंतर त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया (Aditi Hundia) चांगलीच चर्चेत आहे. आदितीनं इशानच्या पहिल्या मॅचपूर्वीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्याला रक्त लावलेलं दिसत आहे. फोटोची स्टोरी देखील तिने शेअर केली आहे.

आदितीचा हा फोटो PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाज्मा या उपचाराच्या दरम्यान काढलेला आहे. चेहऱ्याला होणाऱ्या त्रासावर हे उपचार केले जातात. यामध्ये शरिरातील जवळपास 20 ते 30 मिलिलिटर रक्त काढले जातं. त्यानंतर त्या रक्ताचं रुपांतर प्लाज्मामध्ये करुन इजेंक्शनच्या साहाय्याने चेहऱ्यावर इंजेक्ट केलं जातं.

या उपचारामुळे तत्वेचेवरील कोलेजन प्रोटीन वाढण्यात मदत होते. चेहऱ्यावरील हलक्या सुरकुत्या, वय वाढल्यामुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी या उपचार पद्धतीची मदत होते.

( IND vs ENG : मॉडेल आहे इशान किशनची गर्लफ्रेंड, पाहा HOT PHOTO )

आदितीच्या चेहऱ्यावर याच उपचारामुळे रक्त दिसत होतं. आदितीने इशानला पदार्पणाबद्दल अभिनंदन करताना दोघांचा एक फोटो शेअर केला होता. त्याला तिने 'अभिनंदन माझा क्युटी' असं कॅप्शन दिले होते. आदिती सिद्ध मॉडल असून मिस इंडिया 2017 ची फायनालिस्टही आहे. एवढंच नाही, तर आदितीनं 2018 च्या मिस सुपरनॅचरल इंडियाचं विजेतेपदही पटकावलं आहे. इशान आणि आदिती गेल्या 2 वर्षांपासून एकत्र आहेत.

Published by: News18 Desk
First published: March 15, 2021, 4:02 PM IST

ताज्या बातम्या