IND vs ENG: ‘मी अश्विन आणि अक्षरचं कौतुक का करू? इंझमामचा सवाल

IND vs ENG: ‘मी अश्विन आणि अक्षरचं कौतुक का करू? इंझमामचा सवाल

पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं अहमदाबादमधील पिचवर टीका केली होती. त्यापाठोपाठ आता या वादात पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) याने देखील यामध्ये उडी घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)  यांच्यातील चौथी टेस्ट सुरु होण्यासाठी आता फक्त एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. चौथी टेस्ट अगदी तोंडावर आली असूनही तिसऱ्या टेस्टचा वाद संपत नाही. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूनंतर पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं अहमदाबादमधील पिचवर टीका केली होती. त्यापाठोपाठ आता या वादात पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) याने देखील यामध्ये उडी घेतली आहे.

इंझमामनं त्याच्या युट्यूब (YouTube) चॅनलवर नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) वरील खेळपट्टीवर जोरदार टीका केली आहे. टेस्ट मॅच दोन दिवसामध्ये संपली यावर आपला विश्वास बसत नसल्याचं त्यानं सांगितलं. त्याचबरोबर या प्रकारचं पिच टेस्ट क्रिकेटसाठी योग्य नाही. आयसीसीनं (ICC) त्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यानं केली आहे. यापूर्वी दोन दिवसामध्ये कोणती टेस्ट मॅच संपली होती, हे आपल्याला आठवत नसल्याचंही इंझमामनं यावेळी सांगितलं.

(हे वाचा : जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या बातमीवर युवराजची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला... )

'भारतीय टीम गेल्या काही दिवसांपासून चांगलं क्रिकेट खेळत आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात हरवलं. इंग्लंड विरुद्ध पहिला टेस्ट गमावल्यानंतर भारतीय टीमनं पुनरागमन केलं आणि दुसरी टेस्ट जिंकली. पण या प्रकारचं पिच टेस्ट क्रिकेटसाठी योग्य नाही,' असे इंझमाम म्हणाला

अश्विन-अक्षरचं कौतुक का करु?

भारतीय स्पिनर्स आर. अश्विन (R. Ashwin) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या 20 पैकी 19 विकेट्स घेतल्या होत्या. तरी देखील इंझमाम त्यांचं कौतुक करायला तयार नाही. ‘ज्या पिचवर जो रुट (Joe Root) 8 रन देऊन 5 विकेट्स घेत असेल तिथं मी अश्विन आणि अक्षरचं कौतुक का करु?’ असा प्रश्न इंझमामनं विचारला आहे.

(हे वाचा-जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार विवाहबंधनात, कोण आहे लाईफ पार्टनर?)

टेस्ट मॅचमध्ये मैदान, अंपायर, रेफ्री हे महत्त्वाचे असतात तितकंच महत्त्व पिचला देण्यात यावं अशी मागणी त्यानं केली आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात हरवल्यानंतर टीम इंडियाला जितका आनंद झाला होता तितका आनंद इंग्लंडला हरवल्यानंतर झाला असेल असं आपल्याला वाटत नसल्याचंही इंझमामनं स्पष्ट केले आहे.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 2:12 PM IST

ताज्या बातम्या