मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : पहिल्या मॅचपूर्वी इंग्लंडच्या कॅप्टनचं टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला...

IND vs ENG : पहिल्या मॅचपूर्वी इंग्लंडच्या कॅप्टनचं टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला...

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेनंतर टी20 मालिकेला आता सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या मॅचपूर्वी इंग्लंडचा कॅप्टन इऑन मॉर्गन (Eoin Morgan) याने यजमान टीम इंडियाबाबत (Team India) एक मोठं वक्तव्य केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

अहमदाबाद, 12 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेनंतर टी20 मालिकेला आता सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या मॅचपूर्वी इंग्लंडचा कॅप्टन इऑन मॉर्गन (Eoin Morgan) याने यजमान टीम इंडियाबाबत (Team India) एक मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला मॉर्गन?

'भारतामध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपला आता सात महिनेच शिल्लक आहेत. त्यापूर्वी आम्हाला आमची तयारी समजण्याची एक चांगली संधी आहे. भारतीय टीम ही जगातील सर्वश्रेष्ठ टीमपैकी एक आहे. या टीमला त्यांच्याच मैदानात हरवणं कठीण आहे,' अशी कबुली मॉर्गन याने दिली आहे. 'आगामी टी20 वर्ल्ड कप देखील भारतामध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम प्रबळ दावेदार असेल,' असंही मॉर्गनने सांगितलं आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरसह (Jofra Archer) सर्व खेळाडू फिट असून पहिल्या मॅचसाठी उपलब्ध असल्याचं मॉर्गनने सांगितलं. या मॅचमध्ये कोणते अंतिम 11 खेळाडू खेळतील यावर अधिक माहिती देण्यास मॉर्गनने नकार दिला. आर्चरला दुखापतीमुळे चौथी टेस्ट खेळता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. टी20 मॅचमध्ये सुरुवातीच्या आणि शेवटच्या टप्प्यात अचूक बॉलिंग करण्याची क्षमता आर्चरकडे आहे. मागच्या वर्षी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) स्पर्धेत याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे आर्चर फिट असल्याने इंग्लंडला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

( वाचा : 36 चा आकडा! रवी शास्त्रींनी सांगितलं नंबरचं भारतीय क्रिकेटशी खास नातं )

'इंग्लंड प्रबळ दावेदार'

दरम्यान, 'आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडची टीम विजेतेपदाची दावेदार आहे, असं मत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने व्यक्त केलं आहे. 'इंग्लंडची टीम टी20 क्रिकेटमध्ये नंबर 1 असून विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे,' असं  विराटने सांगितलं आहे.

इंग्लंडने 2019 पासून एकही टी20 मालिका गमावलेली नाही. विशेष म्हणजे विदेशातही इंग्लंडनं सातत्यपूर्ण खेळ केला आहे. इंग्लडने विदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि दोनदा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england