मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS ENG : चेन्नई टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला, टीम इंडियात तीन स्पिनर्सचा समावेश

IND VS ENG : चेन्नई टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला, टीम इंडियात तीन स्पिनर्सचा समावेश

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई, 5 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. भारतीय टीमनं या टीममध्ये आर. अश्विन शाहबाज नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन स्पिनरचा समावेश केला आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटची (Joe Root) ही 100 वी टेस्ट आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला चेन्नईत  सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता भारताला घरच्या मैदानात इंग्लंड आव्हान देण्यासाठी तयार आहे. ऑस्ट्रेलियातल्या जलद खेळपट्टीनंतर आता भारताला घरच्या मैदानातल्या लाल मातीवरच्या धीम्या खेळपट्टीवर खेळायचं आहे. ही खेळपट्टी तिसऱ्या दिवसापासून स्पिनरना मदत करायला सुरूवात करेल.

(हे वाचा-IND vs ENG : चेन्नई टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ऑलराऊंडर टीममधून आऊट)

पहिल्या  टेस्टला  सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा ऑल राऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) दुखापतीमुळे चेन्नई टेस्टमधून आऊट झाला आहे. अक्षरच्या डाव्या पायाचा गुडघा दुखावला आहे. अक्षर पटेलचा पहिल्यांदाच भारतीय टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला होता. चेन्नई टेस्टमधील अंतिम 11 मध्ये तो खेळण्याची शक्यता होती. मात्र दुखापतीमुळे त्याचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण लांबलं आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. आता नव्या सीरिजच्या पहिल्याच दिवशी आणखी खेळाडू दुखापत ग्रस्त झाला आहे.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, ऋषभ पंत, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शाहबाज नदीम

इंग्लंडची टीम

जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉमनिक सिबले, डॅन लॉरेन्स, ओली पेप, बेन स्टोक्स, जॉस बटलर (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन, डॉमनिक बेस, जॅक लीच

First published:

Tags: Cricket