मुंबई, 13 ऑगस्ट : टीम इंडियातील आक्रमक खेळाडू म्हणून मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ओळखला जातो. सिराज आक्रमक बॉलिंगसोबतच मनातील भावना आक्रमकपणे व्यक्त करतो. नॉटिंघम टेस्टमध्ये त्यानं केलेल्या एका कृतीवर दिनेश कार्तिकनं (Dinesh Kartik) नाराजी व्यक्त केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये सिराजनं जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) आऊट केल्यानंतर गप्प बसण्याचा इशारा केला होता. सिराजची ही कृती अनावाश्यक असल्याचं मत कार्तिकनं व्यक्त केलं आहे. भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजच्या दरम्यान कार्तिक सध्या कॉमेंट्री करत आहे.
दिनेश कार्तिकनं 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्रात लिहलेल्या लेखात या विषयावरील मत व्यक्त केलं आहे. 'माझ्या मते सिराजनं विकेट घेतल्यानंतर बॅट्समनला गप्प बसण्याचा केलेला इशारा अनावश्यक होता. त्याची विकेट घेतल्यानंतर हे करण्याची काय गरज होती? सिराजला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये मिळालेला हा पहिला धडा आहे. आपल्या उत्साही सहकाऱ्याला शांत करण्यासाठी विराट कोहलीला पुढं यावं लागेल याचा विचार किती जणांनी केला होता? पण सिराज मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी विराटला घ्यावी लागली.' असं मत कार्तिकनं या लेखात व्यक्त केली आहे.
कार्तिकनं या लेखात पुढे म्हंटले आहे की, 'आक्रमकता वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवता येते. विराट, सिराज, राहुल यासारखे खेळाडू उघडपणे याचं प्रदर्शन करतात. तर टीममधील वरिष्ठ बॅट्समन रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना मी या पद्धतीनं आक्रमक झालेलं पाहिलं नाही. याचा अर्थ ते आक्रमक नाहीत असा होत नाही.
भारतीय फास्ट बॉलर्स सहसा या प्रकाराची शारीरिक आक्रमकतेपासून दूर असतात. ते बॉलिंग करण्याची जबाबदारी पूर्ण करण्यावर भर देतात. हे एक प्रकारे योग्य आहे. विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय फास्ट बॉलर्सनी विदेशात चांगली कामगिरी केली आहे. भारतानं ऑस्ट्रेलियात विजय मिळवला आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध मालिका सुरू आहे. या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे. त्यामध्ये विदेशी टीमवर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळणार आहे.
IND VS ENG: चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फ्लॉप, विराटला घ्यावा लागणार कठोर निर्णय
टीम इंडियानं आक्रमकता दाखवत आम्ही इथं जिंकायला आलो असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे ही मालिका रंगतदार होणार आहे. इंग्लंडच्या टीममध्ये अनेक कमतरता असल्या तरी त्यांना त्यांच्या मैदानात हरवणे अतिशय अवघड आहे,' असे कार्तिकने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england